मदनसुरी : द्रोणाचार्य कोळी
औसा विधानसभा मतदासंघातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टोकाचे कोराळी हे गाव मागील अनेक वर्षापासून या गावाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.आणि बाजूला कर्नाटक सिमेवर टोल नाका असल्याने ते चुकविण्यासाठी कोराळीमार्गे मोठे अवजड वाहने जातात, त्यामुळे हा रस्ता खूपच खराब झालेला आहे, आणि कर्नाटक राज्याला आणि बिदर बस्वकल्यानं आणि गुलबर्गा या कर्नाटकातील शहराला जोडणारा (शॉर्टकट)आणि हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची दूरवस्था झाली असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
हा मार्ग प्रवाशांसाठी सुखर असतानाही प्रशासनाने याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र स्पष्ट पहावयास मिळते आहे. कोराळीमधील अनेक गंभीर रुग्ण रुग्णालयात वेळेत पोहचू शकत नसल्यामुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सदर रस्त्याने जा- ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांना पावसाळ्यात तलावाचे स्वरूप निर्माण होऊन पादचारी दुचाकीस्वार यांना कसरत करावी लागत आहे. येणा-या कालावधीत प्रशासनाने कार्यवाही न केल्यास तीव्र उपोषण करणार याची प्रशासनाने दखल घ्यावी, असा इशारा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.