18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरबस स्थानकाचे बांधकाम रखडल्याने प्रवाशांची गैरसोय

बस स्थानकाचे बांधकाम रखडल्याने प्रवाशांची गैरसोय

एकमत ऑनलाईन

देवणी : विश्वजित कांबळे
येथील एसटी महामंडळाचे नूतन बसस्थानकाचे काम गेल्या अडीच तीन वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. देवणी येथे जवळपास तीस-पस्तीस वर्षापूर्वी दोन एकर जागेमध्ये बसस्थानक बांधले होते मात्र नंतरच्या काळात सदर बसस्थानक जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने व प्रवासी संख्या वाढल्याने ते अपुरे पडत होते. महामंडळाने येथे नवीन बसस्थानक बांधण्याचे नियोजन केले. त्यानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये नूतन बसस्थानक बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला. जुने बसस्थानक पाडून जमीनदोस्त करण्यात आले आणि प्रत्यक्ष बसस्थानकाच्या इमारतीची पायाभरणी करून बेसमेंट लेव्हलपर्यंत काम करण्यात आले मात्र मधेच माशी शिंकली आणि सरकार बदलले. भाजपाच्या काळात माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यानी येथील बसस्थानकाच्या बांधकामाची सुरूवात केली आणि सरकार बदलताच काम थांबले.

आता तीन वर्ष झाले सदर काम हे बंद आहे. नवीन बस स्थानक बांधण्याचे काम तर सोडाच परंतु आहे ते बसस्थानक जमीन दोस्त केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.आता पावसाळा सुरू झाला आहे. आता त्या ठीकाणी १० ते १२ पत्र्यांचे शेड आले. नवीन बसस्थानक बांधण्यासाठी सुरू करण्यापूर्वी प्रवाशांच्या व बस थांबण्याची योग्य ती सोय करण्यात आली नाही. यामुळे एका छोटेखानी शेडमध्ये प्रवाशांना दाटीवाटीत बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. या ठिकाणी स्वच्छतागृहांची कसलीच सोय नसल्याने महिला प्रवाशांची अधिक अडचण होत आहे.

या सर्व गैरसोयींमुळे प्रवासी स्थानकाऐवजी स्थानकाच्या बाहेर येऊन बसची वाट पहात थांबत असतात. देवणी हा तालुका सीमावर्ती असल्याने व येथे मोठा बैल बाजार भरतो. येथून महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगाना या राज्यात प्रवासी जनतेची ये-जा सुरूअसते. शिवाय या स्थानकावरून लांब पल्ल्याच्याही बसेस धावत असल्याने प्रवासी संख्या मोठी असते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या