Wednesday, September 27, 2023

मांजरा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा होणाºया केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे आॅगष्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून शहरात ७ दिवसाआड पाणी देता येईल का यासाठी नियोजन आणि चाचपणी करण्याचे आदेश महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.

पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. या पावसाने प्रकल्पातील पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे़ प्रकल्प अद्यापही मृत साठ्यातच असला तरी उपलब्ध पाणीसाठा लातूरकरांना दिलासा देणारा आहे. लातूर, केज, कळंब यासारख्या मोठ्या शहरांना आणि लहान-मोठ्या शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाºया या प्रकल्पातील पाणीसाठा २७.९० दशलक्ष घनमीटर इतका झाला.

प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यानंतर शहरातील नागरिकांना १० दिवसांच्या ऐवजी ७ दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने केला जाणार आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी
धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली.

त्यानंतर शहराला सात दिवसाआड पाणी देता येते का? हे पाहण्यासाठी नियोजन आणि चाचपणी करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले. ७ दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रशासन नियोजन करत आहे. त्यानुसार आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यपासून लातूरकरांना सात दिवसाआड म्हणजेच आठवड्यातून एक वेळा पाणी देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

Read More  संपादकीय : अमरनाथ यात्रा ‘करोना’!

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या