27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरयोग्य नियोजनाद्वारे खरीपातील पिकाचे उत्पादन वाढवा

योग्य नियोजनाद्वारे खरीपातील पिकाचे उत्पादन वाढवा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
वातावरणातील होणारा बदल, पावसाची अनियमितता व शेतीवरील होणारा अनावश््यक खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने शेतक-यांनी खरीप हंगाम पूर्व कार्यामध्ये अद्यावत तंत्रज्ञान व योग्य नियोजनाद्वारे खरीपातील पिकाचे उत्पादन वाढवावेत, असे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार विद्यावेत्ता अरुण गुट्टे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग लातूरद्वारा आयोजित गरीब कल्याण सम्मेलन व खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळाव्या दरम्यान ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, स्वंय शिक्षण प्रयोगचे कार्यक्रम समन्वयक दिलीप धवन, यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्या दरम्यान आयोजित तांत्रिक सत्रामध्ये अरुण गुट्टे पुढे म्हणाले, सोयाबीन पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतक-यांनी पंचसूत्री बाबींचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे सांगून अधिक उत्पादन देणारे सुधारित वाणाची निवड, पेरणीपूर्वी जैविक व बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, सुधारित रुंद सरी वरंबा व टोकन पेरणी पद्धती, सुयोग्य खत व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पंचसूत्री बाबींचा अवलंब केल्याने शेतक-यांना वर्षाकाठी शाश्वत उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले.

कृषी विज्ञान केंद्रातील पिक संरक्षण विषय विषयज्ञ एस. बी. देशमुख यांनी खरीप पूर्व नियोजनामध्ये सोयाबीन बियाणे उगवण चाचणी, बिजप्रक्रिया व प्रमुख रोग नियंत्रणावरती सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमामध्ये गरीब कल्याण सम्मेलनात पंतप्रधान मोदी यांनी विविध योजनेतील लाभार्धी शेतक-यांशी संवाद साधला. मेळाव्या दरम्यान आयोजित तांत्रिक सत्रामध्ये बायरचे प्रतिनिधी राजेंद्र पाटील यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. सुरवातीस एस. बी. बेद्रे कार्यक्रमाची प्रस्ताविक माहिती दिली. तसेच राजेंद्र कदम व दिलीप धवन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय गावसाने यांनी उपस्थित शेतक-यांना अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रातील व कृषी विभागातील कर्मचारी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गुंजाळ यांनी केले तर डॉ. एस. बी. साळुंके यांनी आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या