35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home लातूर औसा येथे वाढीव वीजबिले घातली चुलीत

औसा येथे वाढीव वीजबिले घातली चुलीत

एकमत ऑनलाईन

औसा : टाळेबंदीच्या काळातील चार महिन्यांचे अवाजवी आकारणी केलेली वीजबिल रद्द करुन माफ करण्यात यावीत यामागणीसाठी महाराष्ट्र नवनर्मिाण सेनेच्या औसा शाखेने मंगळवार दि चार आँगस्ट रोजी महावितरण कार्यालयासमोर विजबीले चुलीत घालून पेटवून देवून अनोखे आंदोलन केले.

कोरोना महामारीच्या या अभूतपूर्व संकटात व टाळेबंदीच्या काळात सर्वत्र व्यवहार ठप्प झाले आहेत. नोकर कपात , पगार कपात होत असल्याने अनेक कुटूंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्मिाण झाला आहे .नेहमीचा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतक-यावर दुबार ,तीबार पेरणीचे संकट यावर्षी ओढावले आहे आणि अशा भयानक परिस्थितीत वाढीव वीजबिले ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहेत व याप्रकारणात ग्राहकांची लूट केली जात आहे.

तालुक्यातील वीज ग्राहकांना महावितरण’ने मार्च ते ऑगस्ट या टाळेबंदी काळातील आकारणी केलेले अवास्तव व अवाजवी अशी वीजबील वसुली न करता ही संपूर्ण वीजबील माफ करावीत या मागणीकरिता व शासनाने अशा परिस्थीतीत वीजग्राहकांची लूट केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसाच्या वतीने ही वाढीव विजबीलं महावितरण कार्यालय औसाच्या समोर तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली चुलीत घालून पेटवून देण्याचे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिष्टमडळाच्यावतीने निवेदनही मनसेच्या वतीने वीज महावितरणचे उपअभियंता यांना देण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष मुकेश देशमाने महेश बनसोडे,जीवन जंगाले,राजेंद्र कांबळे, धनराज गिरी, अनिल बिराजदार,अतीक शेख, उमाकांत गोरे, समाधान फुटाणे,गणू काळे, दशरथ ठाकूर,बाळासाहेब राठोड, तानाजी गरड, गोपाळ शेळके, मच्छींद्र तौर, महादेव गुरूशेट्टे, बाळू सोलाणे, गुणवंत लोहार,व्यंकट जंगाले, विवेक महावरकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Read More  वाशी येथे जनता कफ्र्युला प्रतिसाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या