24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण वाढले असून, ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४५१ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात आज ३५८ रुग्ण वाढल्याने एकूण रुग्णसंख्या १५ हजार ९४५ एवढी झाली आहे, तर आणखी ८ बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४५९ वर जाऊन ठेपली आहे. दरम्यान, आज २४७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

जिल्ह्यात आज ४२१ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यापैकी १५० रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर ८६५ रॅपिड अँटिजन चाचण्यांपैकी २०८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने दोन्ही चाचण्यांचे मिळून एकूण ३५८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१७६ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागच्या काही दिवसांत बाधित नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक राहिले आहे.

त्यामुळे रिकव्हरी रेट ७७.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील रिकव्हरी रेट दररोज सुधारत असल्याने ही एक दिलासाजनक बाब आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १५ हजार ९४५ रुग्णांपैकी १२ हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण घटले आहे.

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या