24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरनिलंग्यातील इंदिरा चौक परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर

निलंग्यातील इंदिरा चौक परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा शहरातील इंदिरा चौक येथील एका व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने प्रशासनाने हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून ३१ घरांचा परिसर १४ दिवसांकरिता सील केला आहे.

शहरातील कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीचे निवासस्थान इंदिरा चौक येथे असल्याने त्या जवळील ३१ घरांचा परिसर प्रशासनाकडून १४ दिवसांकरिता कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे.

हा व्यक्ती एका दुकानात काम करीत असल्याने त्या शेजारील १२ दुकाने स्वॅब येईपर्यंत सील करण्यात आले असून, सदर भागातील व्यक्तींचे स्वॅब निगेटीव्ह आल्यानंतर हा दुकानाचा परिसर मोकळा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील आदी उपस्थित होते.

तर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ३७ व्यक्तींना प्रशासनाने क्वारंटाईन केले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मदनसुरी येथील कोरोना पोझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कातील ४३ जणांना क्वारंटाईन  करण्यात आले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम यांनी सांगितले.

अडचण आल्यास संपर्क साधावा
शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्यावी. कंटेन्मेंट झोनमधील लोकांच्या अत्यावश्यक सेवेकरिता मुसा मेनोद्दीन मुबारक व डॉ. चव्हाण मॅडम या दोघांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्या भागातील नागरिकांना कांही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा, असे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील म्हणाले.

Read More  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी ठरतेय जीवनदायी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या