चाकूर : चाकूर तालुक्यात कोरोनाने डोकेवर काढले आहे. कोरोनापासून तिस-या लॉकडाऊनपर्यंत हा तालुका निरंक होता. मात्र आता कोरोनाने चाकूर शहरासह ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. नळेगावात सात जण कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तालुक्यातील वडवळ ना. ,सुगाव ,नागेशवाडी,लातूररोड ,चाकूर आदी ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण निघाले होते. सोमवारी दि.२७ रोजीच्या अहवालात नळेगाव येथील एक महिला व एक पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला.
मंगळवारी दि. २८ जुलै रोजी तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी नळेगाव येथे सकाळी कोरोनाबाधित क्षेत्रास भेट दिली व तो परिसर सील करण्याच्या सूचना देऊन परिसर सील करण्यात आला. त्या परिसरांची फवारणी करण्यात आली. दोन रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना होम क्वारंटाईन राहण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजकुमार टकटवळे, डॉ.सुधीर चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड , ग्रामसेवक आर.जी.कांबळे ,तलाठी अविनाश पवार, अॅड.घृष्णेश्वर मलशेट्टे, दत्ता राजमाने , आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी गणेश बुजारे, अविनाश ंिशदे, हणमंत भुसे, मामडगे सदानंद क्षीरसागर,ग्रा.पं.कर्मचारी जमील बागवान, भगवान कांबळे , सुधाकर क्षीरसागर,आनंद दांडे, , विजय शेलार , धनराज सुर्यवंशी ,सुरेश सोनवणे , आशा कार्यकर्ती आदी उपस्थित होते. दोन कन्टेमेंट झोन करण्यात आले आहेत.
परिसर सील करण्याच्या सूचना देत असताना त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या वतीने तात्काळ बाधिताच्या अति संपर्कातील २५ व्यक्तीची अॅन्टीजेंन टेस्ट करण्यात आली. त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह निघाला असल्याची माहिती तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे यांनी दिली. लॉकडाऊन असल्याने बाजार पेठ बंदच आहे.
चाकूर तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्येत वाढच होत आहे. कोरोना बाधित. सात पैकी दोन जण लातूर येथे उपचार घेत असून उर्वरित पाच जणांना चाकूर कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सात रूग्णांत दोन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
चाकुर तालुक्यातील विविध गावांत शिरकाव करू पाहणा-या कोरोनाचा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरा बाहेर न पडता घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. मीच माझा व कुटुंबाचा रक्षक या भूमिकेतून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. घरी राहा सुरक्षित राहा. असे आवाहन चाकूर तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी केले आहे.
औषध दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
नळेगाव येथील कोरोना बाधित क्षेत्राची पाहणी करून चाकूरकडे परत असताना नळेगावातील एका मेडिकलवाला मास्क न लावता व्यवहार करीत असलेले निदर्शनास येताच त्यांनी आपली गाडी थांबवली. सदर दुकानदाराला दोन हजार रुपये दंड ठोठावला. अन्य दोघांना २२०० रू दंड ठोठावला. एका दिवसांत ४२०० रुपयांचादंड वसूल करण्यात आला. नळेगाव येथील ग्रा.पं.त .नव्यानेच आलेले ग्रामसेवक आर.जी.कांबळे यांनी दंडाची पावती फाडून दंड वसूल केला.
नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे
कोविडची लक्षणे जाणवत असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगाव येथे तपासणी करुन घ्यावी.नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.मास्कचा वापर करावा सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे यांनी केले आहे
Read More विलासराव देशमुख विद्यालयाची यशाची परंपरा कायम