28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeलातूरसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ

सक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही गंभीर परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून कोरोनाचा प्र्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना प्रभावतीपणे राबविल्या जात आहेत. तरीही मृत्यूदर कमी होत नाही. ही बाब लक्षात घेता आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सक्रिय रुग्णशोध मोहीम दि. १० मे पासून सूरु करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन लक्षणे असलेल्यांची तपासणी केली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मोहिमेतून लक्षणे असलेल्या गंभीर परिस्थिती निर्माण होण्यापुर्वी रुग्णांना उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. १० मे रोजी आयोजित फे सबुक लाईव्ह कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त अमन मित्तल व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळहे यांची उपस्थिती होती.

लक्षणे असूनदेखील अनेकजण चाचणी व उपचारासाठी पुढे येत नाहीत. परस्पर डॉक्टरांना बोलून जुजबी उपचार घेतात. वेळ निघुन गेल्यावर उपचारासाठी दाखल होतात. यामुळे त्यांच्यावर मृत्यूचे संकट ओढावत आहे. बहुतांश रुग्णांबाबत होणारा हा प्रकार बंद करण्यासाठी सक्रिय रुग्णशोध मोहीम सुरु केली आहे. यात डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्तींकडून घरोघरी भेट देऊन सक्रिय रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे असलेल्यांची ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन व तापमान तपासणी केली जात आहे. लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी करुन गरजेनूसार उपचार करण्यात येत आहेत. वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर गंभीर वेळ येण्यापुर्वीच उपचार करण्याचे नियोजन मोहिमेत केले आहे. यातून कोरोनाचा प्रसार तसेच मृत्यूदर रोखण्याचे प्रभावी प्रयत्न आहेत.

गृहविलगीकरणातील रुग्ण आता संस्थात्मक विलगीकरणात
ग्रामीण भागात गृहविलगीकरणात असलेले रुग्ण काळजी न घेता बिनधास्त फिरत आहेत. त्यांच्यामुळेच कोरोनाचा प्रसार वाढत आहे. याला आवर घालण्यासाठी मोठी रुग्णसंख्या असलेल्या हॉटस्पॉट गावांतील गृहविलगीकरण बंद करण्यात येत आहेत. या रुग्णांना शाळा किंवा मंदिरात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. तसे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

जळकोटमध्ये लस घेण्यासाठी गर्दी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या