23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरकाँगे्सच्या शिष्टमंडळाकडून पीक नुकसानीची पाहणी

काँगे्सच्या शिष्टमंडळाकडून पीक नुकसानीची पाहणी

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यांतील अतिवृष्टी झालेल्या गावात माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून दखल घेण्यात आली असून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शेतातील पिकांची पाहणी करून बाधित शेतक-यांना दिलासा दिला. कॉंग्रेस शेतक-यांच्या हक्कासाठी शासनदरबारी प्रयत्न करू, असे आश्वासित केले.

तालुक्यांतील येरोळ, डिगोळ येथे रविवारी झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याबाबत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके यांना तातडीने शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतक-यांच्या भेटी घ्याव्यात, अशा सूचना केल्या. त्यानुसार सोमवारी तालुक्यातील येरोळ,डिगोळ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, अभय साळुंके, तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, युवक तालुकाध्यक्ष सुतेज माने, युवक जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संगांनियोचे अध्यक्ष दत्तात्रय बंडगर, शि.अ.चेअरमन रामकिशन गड्डिमे, माजी किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय बिराजदार यांनी केली.

या संकटात शेतक-याच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभे आहे व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुवठा करु, असे नेत्यांनी शेतकरी बांधवाना सांगितले. यावेळी येरोळ सोसायटीचे चेअरमन अतूल गंभीरेपाटील, डिगोळ चेअरमन तथा उपसरपंच बाबासाहेब पाटील, नवाज पठाण, राजकुमार जाधव, भिमाशंकर तांबोळकर, राम पाटील, गोरख अंबुलगे,मारोती मुंजाळे,बाळू म्हाके,परमेश्वर लोंढे,महमद बागवान, बाळू गायकवाड, योगेश देवकते, शेतकरी शिवाजी बरदाळे, शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या