लातूर : प्रतिनिधी
मयत पोलीस कर्मचा-याच्या वारसास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते
विम्याचा धनादेश वितरीत करण्यात आला. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या वतीने सभासदांचा अपघाती विमा काढण्यात आला होता. संस्थेचे सभासद पोलीस कर्मचारी मच्छिंद्रनाथ वामनराव वर्टी हे नोव्हेंबर २०२१ मध्ये मयत झाले होते. त्यांच्या वारसास १० लाख रुपयांचा अपघाती विम्याचा धनादेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय जेवरे यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्रीमंत मोरे, संचालक सुग्रीव देशमुख, संस्थेचे कर्मचारी एन. एन. कनामे यांची उपस्थिती होती.
मयत पोलीस कर्मचा-याच्या वारसास विम्याचा धनादेश वितरीत
एकमत ऑनलाईन