रेणापूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रेणापूर तालुक्यातील ७ शाखांत २४ हजार ८१८ शेतक-यांनी २ कोटी १८ लाख ७५ हजार ९१९ रूपये खरीप हंगामाचा विमा भरला. शेतक-याला विमा भरण्यासाठी गावातील चेअरमन, गटसचिवाबरोबर विविध संस्थेचे संचालक व बँकेच्या कर्मचा-यानी कोरोना पार्श्वभूमीवर वेळोवेळी शासनाने केलेल्या नियमांचे पालन करीत सहकार्य केल्याबद्दल बँकेचे संचालक अॅड. प्रमोद जाधव यांनी आभार मानले.
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या त्यामुळे ही बॅक राज्यात अव्वल नंबरवर आहे. त्याबरोबर शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. शेतक-याची गैरसोय होऊ नये. यासाठी बँकेत न जाता गावात चेअरमन, गटसचिव यांच्याकडे विमा भरावा असा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतल्यामुळे तालुक्यातील शेतक-यांची गावातच विमा भरला.
हा विमा भरण्यासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थे ५३ चेअरमन , १९ गटसचिव व विविध संस्थाचे संचालक यांनी सहकार्य केले. त्यामुळे रेणापूर तालुुक्यातील ७ शाखेच्या शाखा प्रमुख व इतर कर्मचारी यांनी वेळेची तमा न बाळगता काम केल्यामुळे २० दिवसांत म्हणजे ३१ ताारवेपर्यंत शांततेत ७ शाखेत सभाासदांनी २ कोटी १८ लाख ७५ हजार ९१९ रूपये विमा भरला त्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचाालक अॅड. प्रमोद जाधव यांनी आभार मानले.
शाखानिहाय शेतक-यांची संख्या व रक्कम
४ रेणापूर तालुक्यात दि. १४ जुलै ते ३१ जुलैपर्यंत म्हणजे २० दिवसांत रेणापूर शाखेत ४ हजार १९६ शेतक-यांनी ३५ लारव ४९ हजार ८९३ रूपये, ंिपपळफाटा शाखेत २ हजार ६२७ शेतक-यांनी २२ लाख ११ हजार २७ रुपये, पोहरेगाव शाखा ४ हजार २१८ शेतकरी ३८ लाख ३७ हजार ९३६ रूपये, पानगांव शाखा ४ हजार ३०० शेतकरी ३४ लाख ९१ हजार ८६६ रूपये, कडेपूर शारवा ३ हजार ९७० शेतकरी ३३ लाख ४८ हजार ६२२ रूपये, कामखेडा शाखा २ हजार ५३५ शेतक-यांनी २३ लाख ३ हजार ५११ रूपये , खरोळा शाखेत २ हजार ९७२ शेतक-यांंनी ३१ लाख ३३ हजार ६४ रूपये असा एकूण लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रेणापूर तालुक्यातील ७ शाखेत २४ हजार ८१८ शेतक-यांनी २ कोटी १८ लाख ७५ हजार ९१९ रूपये खरीप हंगामा पीक विमा भरला असल्याची माहिती बँकेचे संचालक अॅड. प्रमोद जाधव यांनी दिली
Read More हुवेई कंपनीला ५-जीचे कंत्राट देऊ नका