22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरआंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा प्रशासनातर्फे उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा प्रशासनातर्फे उत्साहात साजरा

एकमत ऑनलाईन

लातूर : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या कार्यक्रमाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, सहाय्यक पुरवठा अधिकारी महेश सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे, जिल्हा क्रीडा
अधिकारी महादेव कसगावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी आयुष डॉ. विकास पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व त्यानंतर योगशिक्षक श्रुतिकांत ठाकुर व सोनाली मस्कावाड यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या योग प्रात्यक्षिके कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी व काही विद्यार्थी कोरोनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्या फेसबुक पेजवर हा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी लाईव्ह दाखवण्यात आला; या कार्यक्रमाला ही नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या