28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर रेणापूर तालुक्यात १ लाख जणांची तपासणी

रेणापूर तालुक्यात १ लाख जणांची तपासणी

एकमत ऑनलाईन

रेणापूर : राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा दिवसांपासून सुरूअसून १० ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के सर्वे पूर्ण करून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. या अभियानाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांनी प्रतिसाद देत हे अभियान तालुक्यातील वाडी -तांड्यावर वस्ती व गावात यशस्वीपने राबवून १ लाख २ हजार ७०० नागरीकांची तपासणी १११ टीममार्फत करण्यात आली.

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात परस्थिीतीचिंताजनक बनत आहे. ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे. या पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान गेल्या पंधरा दिवसापासून सुरूकेले आहे.या अभियानातंर्गत रेणापूर शहर, गाव, वस्त्या, तांडे येथील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यात ज्येष्ठ व्यक्ती आजारी असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.

प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनूसार गृहभेटी देण्यात येत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्ती दररोज ५० घरांना भेट देऊन घरातील सर्व सदस्यांचा ताप, खोकला, दम लागणे, एसपीओ २ कमी अशी कोविडसदृश लक्षणे असणा-या व्यक्तींना जवळच्या फीव्हर क्लिनिकमध्ये पाठविण्याचा सल्ला देत आहेत. कोमॉर्बिड रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री करीत आहेत . कोमॉर्बिड रुग्णासाठी औषधांचा साठा रुग्णालय स्तरावर उपलब्ध करून देत आहेत.

२३ रुग्ण आढळले पॉझीटीव
रेणापूर तालुक्याची १ लाख ३१ हजार ७६५ लोकसंख्या व २६ हजार ४८५ , घराची संख्या असून १११ आरोग्याच्या टीममार्फत १ लाख २ हजार ७०० लोकांचा व २४ हजार ३७९ घराचा सर्वे करण्यात आला. यात सारीची लक्षणे ३७७,ऑक्सीजन संवृक्तता ९५ पेक्षा कमी २७३, मधुमेह २ हजार ८३ , बी पी २ हजार १३१, किडनी आजार २१ , लिव्हर आजार ४४ इतर ४३५ , संदर्भीत २१९ , स्वॅब ७१ व पॉझीटीव्ह २३ रुग्ण आढळून आले आहेत.

केरळमध्ये सापडली ग्रीक पुराणातील रहस्यमयी आकृती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या