25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeलातूरदैनंदिन आहारात आयोडीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा

दैनंदिन आहारात आयोडीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा

एकमत ऑनलाईन

लातूर : दि. २१ ऑक्टोबर हा दिवस भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यामागचा उद्देश म्हणजे जनतेस दैनंदिन आहारामधील आयोडीनचे महत्व समजावे हा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण दि. २१ ऑक्टोबर रोजी नागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिवस म्हणून साजरा करत आहोत. प्रत्येकाचे आपल्या दैनंददिन आहारात आयोडिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रम्ह असे म्हणतात या अन्न संस्कृतीची दखल जगभरात घेतली जाते पण ? आपल्या देशातच ती लोप पावत चालली आहे. प्रत्येक जन धावपळीच्या जीवनात जंक फूड व फास्ट वापर मोठया प्रमाणात करतात. परिणामी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन त्यांचे शरीर हे आजाराचे माहेर घर बनत चालले आहे. उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, कुपोषण, हायपोथायरॉडीझम इत्यादी आजार उद्भवतात. आपला आहार हा सकस व समतोल असावा जेणेकरुन त्यातून आपल्याला कार्बोदके, प्रथिने, स्त्रिग्ध् पदार्थ, जीवनसत्व, खनिजे हे पोषक घटके मिळतील. आज आपण खनिजा बद्दल बोलायचं झाल तर आपल्या शरीराला थोडया प्रमाणात लागणारा व तेवढाच महत्वाचा घटक म्हणजे आयोडीन होय.

आयोडीन हे खनिज असून ते प्रामुख्याने सागरी मासे (कोळंबी, केलप, नावच शैवाल), सागरी भाज्या आयोडीनयुक्त मीठ, चीज, कोंबडीच्या अंड्यातील पिवळा पदार्थ, दुध, दही इत्यादी घटकातून मिळते. प्रत्येक व्यक्तीस त्यांच्या वयानुसार आयोडीनची मात्रा आवश्यकता असते हे पूढील प्रमाणे दर्शविण्यात आले असून याप्रमाणे प्रत्येकाने दैनंदिन आहारातून आयोडीनची मात्रा घेणे गरजेचे आहे. वय ० ते ११ महिनेपर्यंत आवश्यक आयोडीनची मात्रा (मायक्रोग्राम मध्ये) ५० मायक्रोग्राम, प्रतिदिन, १२ ते ५९ महिनेपर्यंत ९० मायक्रोग्राम/ प्रतिदिन, ६ ते १२ वर्षेपर्यंत १२० मायक्रोग्राम, प्रतिदिन, १२ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस १५० मायक्रोग्राम, प्रतिदिन, गरोदर माता व स्तनदा माता २०० मायक्रोग्राम, प्रतिदिन.

वरीलप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरास आयोडीनची आवश्यकता असते. याप्रमाणेपेक्षा कमी प्रमाणात आयोडीन शरीरास न मिळाल्यास विविध वयोगटात सौम्य किंवा अति गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने गलगंड, तिरळेपणा, हायपोथायरॉडीझम, मेंदूची वाढ खुंटणे, शारीरिक वाढ खुंटणे, मूकबधीरपणा, बुध्यांक कमी होणे तर प्रौढ स्त्रिांमध्ये वारंवार गर्भपात होण्याचे प्रकार उद्भवतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणतेही आजार उद्भवू नयेत याकरिता प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन आहारात आयोडीनयुक्त आहाराचा समावेश करावा जेणेकरुन आपले व भावी पिढीचे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस.देशमुख यांनी केले आहे.

सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्यावी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या