21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूर१५ रास्त भाव दुकानांना आयएसओ मानांकन

१५ रास्त भाव दुकानांना आयएसओ मानांकन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट पर्यंत लातूर तालुक्यातील २४८ रास्त भाव दुकाना पैकी १५ रास्त भाव दुकाने आयएसओ मानांकनासाठी दि. १५ ऑगस्ट पर्यंत डिजीटल करण्याच्या जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार लातूर तालुक्यातील १५ रास्त भाव दुकाने आयएसओ मानांकन प्राप्त झाली आहेत.

लातूर तालुक्यातील १५ रास्तभाव दुकानदारांच्या दुकानास प्रत्यक्ष भेट देवून रास्त भाव दुकानदार चालकांनी सी.सी.टी.व्ही कॅमेरे, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी लाभार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे, तक्रारपेटी, भाव फलक, धान्यसाठा फलक, तक्रार निवारणासाठी मोबाईल क्रमांक, अन्न व औषध प्रशासनाचा परवाना, वजने मापे विभागाचा परवाना, इत्यादी आवश्यक अद्यावत अभिलेखासह माहितीचे फलक रास्त भाव दुकानाच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. स्वस्त धान्य दुकानाचा पारदर्शक कारभार चालावा यासाठी आयएसओच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या तक्रार कमी होतील, असे मत तहसीलदार स्वप्नील पवार यांनी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार कुलदीप देशमुख व रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष हंसराज जाधव व उपाध्यक्ष सादिकअली शेख हे उपस्थित होते.

लातूर तालुक्यातील डी. आर. सुरवसे, दुकान नं. ३७ सेन्ट्रल हनुमान, व्ही. जी. माने, दुकान नं.३६ खोरेगल्ली, सादीकअली उस्मानसाब शेख, दुकान नं. ३४ खोरे गल्ली, श्रृती महिला बचत गट, दुकान नं. ३० खणी विभाग, एस. टी. माने, दुकान नं. ९४ अवंतीनगबर, सी. एस. स्वामी, दुकान नं. ९ साळेगल्ली, साईकृपा महिला बचत गट, दुकान क्रं. १३ इत्यादी लातूर शहरातील दुकाने व लातूर ग्रामीण मधील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, कव्हा, आर. एम. मोरे, भाडगांव, पंचशिला महिला बचत गट, म्हाडा कॉलनी, पी.व्ही.आडसुळ, बोडका, चे.विविध कार्यकारी सेवा सोसायटी, मुरुड, बी. एस. लाहाडे, रुई, चे.विविध कार्यकारी सेवा सोसायटी, बाभळगांव, ए. आर. देवधारे, तांदुळजा इत्यादी दुकाने आयएसओ मानांकन तपासणी सुचिप्रमाणे अद्यावत करण्यांत आलेली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या