26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरलातूर पंचायत समितीला आयएसओ नामांकन

लातूर पंचायत समितीला आयएसओ नामांकन

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर पंचायत समितीने यशवंत पंचायत राज अभियानात राज्य, विभाग स्तरावरच्या पुरस्कारावर आपले नाव कोरल्या नंतर पंचायत समितीच्या प्रशासनाने केलेल्या प्रशासकीय कामकाजाची दखल पिक्सल टिच आसीव्ही, दिल्ली यांनी घेतली आहे. त्यांनी प्रशासकीय कार्यबद्दल लातूर पंचायत समितीला आयएसओ नामांकन बहाल केले आहे. त्यामुळे लातूर पंचायत समितीच्या शिरेपेचात आणखी एक आयएसओ ९००१: २०१५ नामांकनाच्या मानाचा तुरा खोवला गेला आहे.

यशवंत पंचायतराज अभियानात ठसा उमटवणा-या लातूर पंचायत समितीने उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजातही उल्लेखनीय कार्य केले आहे. यात प्रशासकीय कामकाजाची रचना व कार्यपध्दती, कर्मचारी व्यवस्थापन, अभिलेखांचे वर्गीकरण करणे, निर्लिख, तक्रार निवारण, झिरो पेन्डसी करण्यात यश मिळविले आहे. या बरोबरच व्यवस्थापन, सुसज्ज इमारत, उत्कृष्ठ बैठक व्यवस्था, अद्यावत सभागृह, अभ्यंगत कक्ष, माहिती कक्ष, इमारत व इमारत परिसराची स्वच्छता, बगिचा सुशोभिकरण करण्याच्या बरोबरच सांडपाणी व्यवस्थापन मार्गी लावले आहे. सर्व विभागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लातूर पंचायत समितीला आएसओ ९००१: २०१५ नामांकन प्राप्त झाले आहे.

लातूर पंचायत समितीला एप्रिल मध्ये पिक्सल टिच आसीव्ही, दिल्ली यांनी भेट देवून कार्यालयीन कामकाजाचा निपटारा, स्वच्छता, इमारत परिसर, अभिलेख्यांचे वर्गीकरण, सुशोभीकरणाची पाहणी केली होती. या ऑडीट नंतर लातूर पंचायत समितीला आएसओ ९००१: २०१५ नामांकन बहाल केल्याचे प्रमाणपत्र गटविकास अधिकारी तुकाराम भालके, कार्यालयीन कक्ष अधिकारी चंद्रकांत कदम यांच्याकडे दिले.

आएसओचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करू
लातूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी शाम गोडभरले, कार्यालयीन कक्ष अधिकारी चंद्रकांत कदम व अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून लातूर पंचायत समितीला आएसओ ९००१: २०१५ नामांकन प्राप्त झाले आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी रेकार्ड अद्यावत ठेवणे, इमारत स्वच्छता, चांगल्या सेवा, इमारात परिसरात केलेली स्वच्छता व सुशोभीकरण याचे ऑडीट झाल्यानंतरच लातूर पंचायत समितीला आएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. हा दर्जा काम राखण्यासाठी या पुढच्या कालावधीत प्रयत्न करू, अशी प्रतिक्रीया लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या