24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरपथविक्रेत्यांना परवाने दिले; भाडे सुरू पण जागेचाच पत्ता नाही

पथविक्रेत्यांना परवाने दिले; भाडे सुरू पण जागेचाच पत्ता नाही

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शहरातील सुमारे ७०० फेरीवाले व पथविक्रेत्यांना लातूर शहर महापालिका प्रशासनाने अधिकृत पथविक्रेता परवाने जानेवारी २०२२ मध्ये दिले. तेव्हापासून म्हणेजच गेल्या नऊ महिन्यांपासून पथविक्रेते दर महा ५०० रुपये भाडे महानगरपालिकेच्या तिजोरीत भरीत आहेत. परंतु, महानगरपालिकेने अद्यापही या पथविक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. पथविक्रेत्यांना परवाने दिले, भाडेही सुरू झाले पण जागेचाच पत्ता नाही, अशी परिस्थिती झाली आहे. दिरंगाई महानगरपालिकेची आणि अतिक्रमण म्हणुन पथविक्रेत्यांवर जेसीबीही महानगरपालिकेचाच चालवला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात फे रीवाला, पथविक्रेता धोरण राबविण्यात येत आहे. त्याकरिता शहरातील हॉकर्स झोन व नॉन हॉकर्स झोनविषयी लातूर शहर पोलिस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला प्रस्ताव दिलेला आहे. त्या प्रस्तावानुसार शहरातील गंजगोलाईमधील डिव्हायडरच्या आतील बाजू, गंजगोलाईतील मंदीराची गोलाकार जागा, जिल्हा क्रीडा संकुलाची संरक्षण भिंंत, अंबाजोगाई रोडवरील बस डेपोच्या पाठीमागील जागा, महात्मा गांधी चौकातील जुने रेल्वे स्टेशनच्या समोरील जागा, गांधी मार्केटमधील व्यंकटेश विद्यालयाची पाटभिंत, राजीव गांधी चौक परिसरातील बिडवे लॉन्सच्या बाजूचे गायरान, अष्टविनायक मंदीर परिसरातील जागा, बार्शी रोडवरील चौंडा हॉस्पिटलजवळील ग्रीन बेल्ट, खणीजवळील गायरान, ५ नंबर चौकापासून ७५ मीटरवरील खुली जागा, हॉकर्स झोन म्हणून दिलेल्या आहेत. त्यापैकी जिल्हा क्रीडा संकुलाच्या संरक्षण भिंतीला पुर्वीपासूनच पथविक्रेते आपापला व्यवसाय चालवत असल्यामुळे त्यांना जागेची अडचण नाही. परंतु इतर हॉकर्स झोनमध्ये अद्यापही महानगरपालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिलेली नसल्याने पथविके्रते आपापला व्यवसाय अनंत अडचणीतून चालवत आहेत.

गंजगोलाईतील व इतर ठिकाणच्या सुमारे ७०० पथविक्रेत्यांना महानगरपालिकेच्या वतीने जानेवारी २०२२ मध्ये रितसर पथविक्रेता परवाने दिलेले आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून परवानाधारक पथविक्रेते दर महा ५०० रुपये भाडेही मनपाकडे भरत आहेत. परंतु त्यांना अद्यापही पिवळे पट्टेमारुन अधिकृत जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. परिणामी पथविक्रेते अद्यापही रस्त्यावरच आपला व्यवसाय चावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आले तशीच आहे. पथविक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात महानगरपालिकेचीच दिरंगाई असताना महानगरपालिकाच या पथविक्रेत्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करीत आहेत्.ा. त्यामुळे पथविक्रेत्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या