27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरआंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनीयुक्त पथदर्शी प्रकल्प व्हावा

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनीयुक्त पथदर्शी प्रकल्प व्हावा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील मुख्यमार्गाला पर्यायी रस्ता म्हणून बांधण्यात येत असलेल्या विलासराव देशमुख मार्गाच्या कामांची पाहणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी पाहणी केली. मिनी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे कामासाठी १४ कोटी ४५ लाख ५६ हजार रुपये खर्च होणार असून लातूरच्या वैभवात भर टाकणा-या या मार्गाचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने करुन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयीसुविधांनीयुक्त पथदर्शी प्रकल्प असावा, सुचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजनेतून लातूर शहरातील अत्यंत महत्वाचा असलेला विलासराव देशमुख मार्ग नव्याने बांधण्यात येत आहे. लातूर शहरातील वाढती रहदारी आणि त्यामूळे मुख्यमार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी हा पर्यायी मार्ग नव्याने बांधण्याचा निर्णय तत्कालीन पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेऊन त्यातील मिनी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या पहिल्या टप्प्यासाठी जवळपास १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या महामार्गाचे काम सुरु झाले असून मंगळवारी सकाळी या कामांची पाहणी त्यांनी केली. हा मार्ग लातूर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्यामूळे कंत्राटदार व सार्वजनीक बांधकाम विभागाने अत्यंत काळजीपूर्वक नियमानूसार दर्जेदार पध्दतीने काम करावे अशा सुचना त्यांनी केल्या.

लातूर शहराच्या मधोमध बांधण्यात येत असलेल्या या विलासराव देशमुख मार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयीसुवीधा उभारण्यात येणार असून तो महाराष्ट्रातील एक पथदर्शी मार्ग म्हणून नावारुपाला यावा, अशी माजी मंत्री आमदार आमदार अमित देशमुख यांची संकल्पना आहे. सदरील रस्ता एकूण १५ मीटर रुंद चारपदरी रस्ता आहे, रस्त्याच्या दक्षिणेला पब्लीक प्लाजा असून या ठिकाणी वाचनकट्टे, वायफाय, विश्रांती थांबे व खाद्य पदार्थाची सोय आदी सुविधा होणार आहेत. वयोवृध्दासाठी, लहानमुलांसाठी या ठिकाणी अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. रस्त्याच्या उत्तर बाजूस वॉकीग आणि सायकल ट्रॅकची उभारणी होणार आहे. या मार्गावर बस आणि रिक्षा स्टॅड उभारणी तसेच स्वतंत्र पार्कीगचीही व्यवस्था करण्यात येणार आहे, या मार्गावर प्रभावी सिग्नल यंत्रणा उभारली जाईल, या ठिकाणची ड्रेनेज व विजवाहीन्याची व्यवस्था जमीनीखालून असेल, त्याच बरोबर रस्त्याच्याकडेला व दुभाजकात आकर्षक वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अ‍ॅड. समद पटेल, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष डोपे, डॉ. महादेव बनसोडे, डॉ. शालिनी सांगळे, डॉ. ब्रिजेश बाचपल्ले, माजी नगरसेवक युनूस मोमीन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उपअभियंता रोहन जाधव, उपअभियंता विजय सोनटक्के, शाखा अभियंता विजय आवाळे, सिकंदर पटेल, प्रवीण सूर्यवंशी, दिनेश गोजमगुंडे, बालाजी झिपरे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या