35.2 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeलातूरमनपा शाळांना महापुरुषांची नावे देण्याची अंमलबजावणी करावी

मनपा शाळांना महापुरुषांची नावे देण्याची अंमलबजावणी करावी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांना महापुरुषांची नवे देण्याचा ठराव दि. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी लातूर शहर महानगरपालिकेने घेतलेला आहे. परंतू, अद्याप या ठरावाची अंमलबजावणी होत नाही. या ठरावाची अंमलबजावणी करुन मनपा शाळांना महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन लहुजी आर्मी वॉरिर्यसने मनपा आयुक्तांना दिले आहे.

शहरातील महानगरपालिकेच्या शाळांना महापुरुषांची नवे देण्यात यावीत, अशी मागणी जनतेतुन होत होती. त्याप्रमुळे दि. १२ ऑक्टोकबर २०२१ रोजी महानगरपालिकेत तसा ठराव घेण्यात आला सदर ठरावात लातूर शहरातील मनपाच्या एकूण १५ शाळांना मदर तेरेसा, महात्मा ज्योतिबा फुले, इंदिरा गांधी, महात्मा बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, डॉ. फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, वस्ताद लहुजी साळवे, माता रमाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद. ही नावे १ ते १५ शाळा देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. परंतु गेले दोन वर्षपासून सदर ठरावाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे जन सामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.

सदर ठरवाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन लहुजी आर्मी वॉरिर्यस संघटनेचे अध्यक्ष आशुतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्तांना देण्यात आले. यावेळी रवि भेटाडे, रवी अर्जुने, श्याम जाधव, नूतन हनुमंते, सचिन कांबळे, प्रदीप थोरात, सोमनाथ शिंदे, परम जोगदंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या