19.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home लातूर कमी क्षेत्रात उसाचे अधिक उत्पन्न घेणे काळाची गरज

कमी क्षेत्रात उसाचे अधिक उत्पन्न घेणे काळाची गरज

एकमत ऑनलाईन

विलासनगर : निसर्गाचा असमतोल, ऊस गाळप व ऊस संगोपनाचा खर्च पाहता ऊस उत्पादक शेतक-यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेतल्यास एकरी ऊसाचे टनेज वाढण्यास मदत होईल व त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा शेतक-यांना होऊ शकतो त्यामुळे काळाची गरज ओळखून शेतक-यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणा-या ऊस जातीची लागवड करावी, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक तथा चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३४ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी लातूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक एस. आर. देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हाईस चेअरमन शाम भोसले, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, नाथसिंह देशमुख, अभय साळुंखे, दगडूसाहेब पडीले, संभाजी सूळ, सचिन दाताळ, नारायण लोखंडे, चंद्रकांत पाटील, अमर मोरे, युवराज जाधव, राजेसाहेब सवई, अनिल कुटवाड, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले की, विकासरत्न विलासराव देशमुख यांनी साखर कारखानदारी कशी चालवावी याची दिशा दाखवली त्या वाटेवर मांजरा कारखाना शेतकरी सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव तत्पर असून मांजरा कारखान्याने आधुनिक पद्धतीचा अवलंब करु इच्छिना-या शेतक-यांना मदत करण्याची भूमिका नेहमीच स्वीकारली आहे. मांजरा कारखाना आपला ३४ वा गळीत हंगाम निश्चितपणे यशस्वी करुन आपली परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यांनी विद्यमान गळीत हंगामात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप उद्दिष्ट ठेवले असून मागील गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रात ऊस व पाण्याची उपलब्धता अपेक्षेप्रमाणे नसल्याने मांजरा कारखाना सुरु होऊ शकला नाही. मात्र अशा परिस्थितीत दिलीपराव देशमुख साहेबांनी जागृती कारखाना सुरु ठेवून मांजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांना आधार देण्याचे काम केले. याबद्दल जागृती कारखाना संचालक मंडळाचे आभार त्यांनी व्यक्त केले.

आपल्या स्वागतपर मनोगतात कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात व संचालक मंडळाच्या सहकार्याने गळीत हंगाम २०२०-२०२१ यशस्वी करण्यासाठी जे नियोजन केले आहे त्यानुसार कारखाना प्रशासन कार्य करण्यास सज्ज असून शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी मांजरा कारखान्याकडे द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बॉयलरची विधिवत पूजा कारखान्याचे संचालक सूर्यकांत पाटील यांनी सपत्नीक केली तर कारखान्याचे आराध्य दैवत मांजरे श्वर हनुमान मंदिर व गणेश मंदिर येथे सपत्नीक बंकट कदम यांनी विधिवत अभिषेक पूजा केली.

याप्रसंगी मांजरा कारखान्याचे संचालक सर्वश्री तात्यासाहेब देशमुख वसंत उफाडे, सदाशिव कदम, अनिल दरकसे, धनराज दाताळ, निळकंठ बचाटे, ज्ञानेश्वर पवार, नवनाथ काळे शेरखान पठाण, बाबुराव जाधव ,शंकर बोळंगे, ज्ञानेश्वर भिसे, महेंद्रनाथ भादेकर, अनिल पाटील, प्रताप पाटील, नारायण पाटील, रेणाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवाजीराव मोहिते यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

साखर कारखानदारीतील पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी मांजरा परिवाराने मोडून काढली
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याच्या गळीत हंगामास शुभेच्छा देत असताना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, साखर उद्योगातील पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत काढून मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी देशभरात आदर्श निर्माण केला आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने उत्तम रीत्या सुरु असून लातूर जिल्ह्याच्या अर्थकारणात मोठा वाटा या कारखान्यांचा आहे असे सांगून एक लोकप्रतिनिधी या नात्याने लातूर ग्रामीण मतदार संघ हा विकासाचा मॉडेल म्हणून नावारुपास आनण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले.

गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने दसरा मिरवणूक उत्साहात

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

मतदान प्रक्रियेवर कंट्रोल रुममधून नजर

लातूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील एकुण ८८...

‘शाहू’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथमच्या यादीत

लातूर : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये १ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीबीटी पद्धतीने ३२ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी...

लातूर जिल्ह्यात ६४ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शनिवारी एकूण ६४ नवे रुग्ण आढळून आले असून, आज आणखी...

महाविकास आघाडी स्थापण्यात अहमद पटेल यांचा सिंहाचा वाटा

लातूर : मला अभिमानाने सांगावेसे वाटते, ज्येष्ठ नेते अहमद पटेल नसते तर महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती आपण साजरी करु शकलो नसतो. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...