24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरऐतिहासीक वारशाचे जतन करुन लातूरच्या सर्वांगीण विकासाला गती देणार

ऐतिहासीक वारशाचे जतन करुन लातूरच्या सर्वांगीण विकासाला गती देणार

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरच्या ऐतिहासीक व सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन करुन शहराच्या सर्वांगीण विकसाला चालना दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशातील वैशिष्टयपूर्ण रचना असलेल्या लातूर येथील गंजगोलाई या बाजारपेठेच्या वास्तुला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. शताब्दी वर्षाच्यानिमित्ताने गंजगोलाईचे सुशोभिकरण करण्याची सुचना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली होती. सुशोभिकरणाचे हे काम आता पूर्ण झाले असून अत्यंत प्रेक्षणीय झालेल्या या वास्तुचे लोकार्पण विजयादशमीच्या दिवशी पालकमंत्री श्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर विक्रांत गोजमगुंडे होते. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोंधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सुळ, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, युनुस मोमीन, अहेमदखां पठाण, रविशंकर जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्ण कांबळे, विजयकुमार साबदे, गोरोबा लोखंडे, गंजगोलाई व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष रईस टाके, अ‍ॅड.समद पटेल, कैलास कांबळे, दगडूअप्पा मिटकरी, प्रदिपसिंह गगणे, देविदास बारूळे, अ‍ॅड. सुनित खंडागळे, बिभीषण सांगवीकर, यशपाल कांबळे, कलिम शेख, सत्तारभाई शेख, दत्ता सोमवंशी, गौरव काथवटे, सुंदर पाटील कव्हेकर, शेख अब्दुल्ला, अक्षय मुरुळे, राम गोरड, अविनाश बट्टेवार, सहदेव मस्के, करीम तांबोळी यांच्यासह विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी व अनेक मान्यवर उपसिथत होते.

लातूर शहराला थोर असा ऐतिहासीक, सांस्कृतिक, राजकीय वारसा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा नेहमीच प्रयत्न झाला असल्यामुळे येथे सामाजिक सलोखा टिकून आहे. शहर अत्यंत वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे नमूद करून हा वारसा आणि संस्कृती जपण्याचे काम भविष्यातही होत राहील, असे पालकमंत्री श्री देशमुख यांनी यावेळी बोलतांना महटले आहे. लातूर महापालीकेने महिलासाठी मोफत शहर वाहतुक बस सुविधा उपलब्ध करुन दिल्या बद्दल अभिनंदन करुन, अशी सुविधा देणारे लातूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे. या उपक्रमाचे आत राज्यात अनुकरण होईल असेही पालकमंत्री श्री देशमुख म्हणाले.

महापौर विक्राम गोजमगुंडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना लातूर शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास प्रकल्पाची माहिती देऊन सर्वांना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. प्रास्ताविक आर्किटेक पंकज काटोले यांनी केले. प्रारंभी महापौर विक्रांत गोजमगुंडे, रईस टाके, गौस गोलंदाज, पंकज काटोले, जाफरभाई यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. सुत्रसंचालन यशपाल कांबळे यांनी केले.

३१ डिसेंबर पुर्वी लातूर शहरात शंभर टक्के लसीकरण पूर्ण व्हावे
कोरोना महामारीतून आता आपण बाहेर पडत आहोत. लसीकरणाचा वेग वाडल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यात आपणाला यश मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन लातूर शहरात ३१ डिसेंबर पुर्वी शंभर टक्के लसीकरण करावे अशा सुचना आपण दिल्या आहेत. त्या दृष्टीने शासन, महापालीका प्रशासन प्रयत्न करीत आहे. हे प्रयत्न अधिक गतीने झाल्यास यावर्षाअखेर शंभर टक्के लसीकरण करणारे लातूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरेल असेही पालकमंत्री श्री देशमुख यांनी म्हटले आहे.

नवीन वस्तीमध्ये मुलभूत सुविधा मिळणार
लातूर शहर व परिसराचा विकास करण्यासाठी लातूर महापालीकेची हद्द वाढ करण्याची प्रक्रीया सुरु झाली असून त्यामुळे शहरा नजीकच्या भागात मुलभुत सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. यातून शहराचा सुनियंत्रीत विकास होणार असल्यामुळे भविष्यात अनेक अडचणी दूर होणार आहेत, यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर लातूरसाठी एलएमआरडीए स्थापन करता येते का यादृष्टीने विचार केला जाईल असेही पालकमंत्री श्री देशमुख यांनी म्हटले आहे.

गंजगोलाई परीसर विकसासाठी शंभर कोटीचा अराखडा तयार करावा
गंजगोलाईचे सुशोभिकरण अत्यंत उत्कृष्ट झाले असल्याचे नमूद करुन या संपूर्ण बाजारपेठेचा नुतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यासाठी शंभर कोटीचा अराखड तयार करावा, त्यात रस्ते, स्कायवॉक, सीसीटीव्ही, पार्कीग, वृक्षारोपण या गोष्टीचा समावेश करावा. या प्रकल्पासाठी शासनाच्या वतीने सर्वेतोपरी सहकार्य करण्यात येईल. गंजगोलाईला पुरातत्व वास्तुचा दर्जा प्राप्त करुन देऊन तिच्या संवर्धनासाठी पुराततत्व विभागाकडूनही निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल असे, आश्वासन पालकमंत्री श्री देशमुख यांनी दिले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या