लक्ष्मण पाटील निलंगा : कोरोना माहामारीचे संकट नष्ट व्हावे म्हणून ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे शिष्य मनोहर जाधव हे तालुक्यातील केळगाव येथील डोंगरातील महादेव मंदिरात २१ दिवसाचा जप करीत मौन धारण करून देवाची प्रार्थना करीत बसले असल्याची माहिती औसेकर महाराजांचे चोपदार उत्तम पांचाळ यांनी सांगितले.
देशासह जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने मानवाचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे म्हणून या महामारीच्या संकटातून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून ह. भ. प. गहिनीनाथ महाराज यांचे औसा तालुक्यातील वाघोली येथील शिष्य मनोहर जाधव हे केळगाव (ता निलंगा) येथील वनविभागाच्या डोंगरात असलेल्या महादेव मंदिरात दि ३० जुलैपासून २१ दिवसांचे जप करीत मौन धारण करून बसले आहेत.
ते मौन धारण करून विठ्ठल नामाचा जप, ज्ञानेश्वरी, भागवत गीता , पारायण यांचा जप करीत बसले आहेत .जाधव हे गुरूनिष्ठतेने मग्न होऊन भाव , भक्तीचा जप करीत कोरोनाचे संकट दूर होऊदे म्हणून आनुष्ठानास बसले असून ईश्वराच्या व गुरूच्या कृपाशीर्वादाने हे निर्वघिन आनुष्ठान पूर्ण होऊन जागावरील कोरोना माहामारीचे संकट जावे असे सद्गुगुरूऔसेकर महाराजांचे चोपदार उत्तम रामराव पांचाळ एकमतशी बोलताना म्हणाले.
विकासरत्न विलासराव देशमुख यांना आदरांजली