25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरजागृती शुगरच्या गाळप हंगामाचा विजयादशमीला प्रारंभ

जागृती शुगरच्या गाळप हंगामाचा विजयादशमीला प्रारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील खाजगी साखर कारखानदारीत अधिक भाव देवुन ऊस उत्पादक शेतक-यांची आर्थिक क्रांती घडवना-या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याचा ११ व्या बॉयलर अग्निप्रदिपन व २०२२-२३ चा गाळप हंगामाचा शुभारंभ विजयादशमी दिवशी बुधवार दि. ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता जागृती शुगर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व त्यांच्या सुविध पत्नी सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या सह विवीध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे

जागृती शुगर साखर कारखान्याने एक पाऊल पुढे टाकत ११० के. एल. पी. डी. क्षमतेच्या ज्यूस टू इथेनॉल प्रकल्प सुरु केला असून या प्रकल्पाचे बॉयलर समारंभ विजयादशमी दिवशी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आह. यामुळे जागृति शुगरच्या कार्यक्षेत्रात येणा-या देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, चाकुर तालुक्यातील उस उत्पादक सभासद शेतक-यांना आर्थिक मदत होऊन अधिकचा भाव मिळणार आहे. या भागातील लोकांना पुन्हा अधिक चांगले दिवस येणार आहेत. या दोन्ही समारंभास उस उत्पादक, शेतकरी सभासद, ठेकेदार, हितचिंतक, नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा सौ गौरवीताई अतुल भोसले (देशमुख), उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप माने, संचालक सूर्यकांत कर्वा, सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या