26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरजागृती शुगरचा ज्यूस टू इथेनॉल आसवनी प्रकल्पाची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार

जागृती शुगरचा ज्यूस टू इथेनॉल आसवनी प्रकल्पाची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
खाजगी साखर कारखानदारीत मराठवाडा व विदर्भात अव्वल स्थानावर असलेल्या व एफ.आर.पी पेक्षा अधिक भाव देवुन उस उत्पादक शेतक-यांना आधार देणा-या मांजरा साखर परिवारातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचा नविन ११० ङ’स्र िज्युस टू इथेनॉल प्रकल्पाची उभारणी होत आहे. त्या प्रकल्पास माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक दिलीपराव देशमुख यांनी सोमवारी ४ जुलै रोजी भेट देवून डीस्टीलेशन कॉलम, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, डायजेस्टर, बॉयलर या सर्व ठिकाणची पाहणी केली असून सप्टेंबर महिन्यात ११० ‘’स्र िआसवणी व इथेनॉल प्रकल्पाची चाचणी होणार असल्याची माहिती माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे.

जागृती शुगर कारखाना प्रकल्प स्थळी युनिव्हर्सल फोर्सेस इंडस्ट्रीज लि., पुणे चे चेअरमन प्रदिप ढोकरे यांनी या नियोजित प्रकल्पाची माहिती दिल. यावेळी माजी मंत्री जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख, सौ सुवर्णाताई देशमुख, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप माने, संभाजी रेड्डी, जनरल मॅनेजर जी.जी येवले, हरीराम कुलकर्णी,
जागृती शुगरचे कृषि अधिकारी आर. के .कदम, चीफ अकाँटंट एस, व्हि, वाकडे, डीस्टीलरी इन्चार्ज विलास पाटील, चिफ इंजिनिअर अतुल दरेकर, एस. एस. नागरगोजे, विविध खाते प्रमूख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जागृतीमुळे शेतक-यांची प्रगती
महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा या चार सीमेच्या बॉर्डरवर लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर साखर कारखाना दहा वर्षापूर्वी उभा राहीला. एकेकाळी हा भाग विकासापासून कोसो दूर होता. उसाला योग्य भाव मिळत नव्हता. उस गाळप करण्यासाठी साखर कारखाना नव्हता. त्यामुळें शेतक-यांना पाणी असूनही साश्वत पिक अधिक भाव मिळत नव्हता. मात्र जागृती शुगर साखर कारखाना दहा वर्षापूर्वी उभा राहिला. आज या साखर कारखान्यामुळे आजूबाजूला असणारे देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, कर्नाटक राज्यातील हुलसुर, बसवकल्याण, कमालनगर या तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादक शेतक-यांना मोठा फायदा झाला आहे. आज जिकडे तिकडे उसाचे क्षेत्र वाढल्याने ग्रामीण भागातील लोकांना जागृतीचा मोठा आधार मिळाला आहे, हे वास्तव्य चित्र बघायला मिळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या