29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeलातूरजळकोट पं. स.चा ३६ कोटींचा आराखडा

जळकोट पं. स.चा ३६ कोटींचा आराखडा

एकमत ऑनलाईन

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट पंचायत समिती मनरेगा विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा समृद्धी बजेट २०२३-२४ चा आराखडा तयार करण्यात आला असून तब्बल ३६ कोटी १५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात ९८ हजारांच्यावर वैयक्तीक तसेच सार्वजनिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे आता ४३ ग्रामपंचायतीअंतर्गत मागेल त्या मजुराला काम उपलब्ध होणार आहे.

जळकोट तालुक्यातील मजुरांसाठी पंचायत समितीच्या वतीने दरवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठीचा आराखडा तयार करण्यात येतो. या कामांमध्ये वैयक्तीक कामे, सार्वजनिक कामे , तसेच सेल्फ वरील कामांचा समावेश आहे. वैयक्तिक कामे ५८, २१५, सार्वजनिक कामे ३८ हजार ५७५, तर सेल्फ वरील कामे १३९८ अशा एकूण ९८ हजार १८८ कामाचा समावेश आहे . तालुक्यात गावनिहाय कामे पुढीलप्रमाणे आहेत अतनूर १३१५, बेळसांगवी- १३९६, बोरगाव १३९५, चेरा- १०४२,चिंचोली- ९७४, धामणगाव १२०४, ढोर सांगवी ९९३, डोंगरगाव १११६, एकुरका खुर्द १११४ गव्हाण ९०९, घोणसी १६२२, गुत्ती १४१५, हळद वाढवणा १३३३, हावरगा १४७७, होकर्ण १८२०, जगलपूर २०७४, करंजी १९००, केकतशिंदंगी १९३०, डोंगर कोणाळी १८१२, कुणकी २१५३, लाळी बुद्रुक २२९५, लाळी खुर्द १८४८, माळीपरगा २५९९, मंगरूळ २३५९, मरसांगवी २२२६, मेवापूर २२१४ ,पाटोदा बुद्रुक ३१२६, पाटोदा खुर्द २५४६, रावण कोळा ४२१६, शेंलद्ररा ४६१२, शिवाजीनगर तांडा २६२७, सोनवळा २७०८, सुलाळी २३६६, तिरका ४२३४, उमरदरा ४२४७, उमरगा रेतू ३६२८, विराळ ४४६६ ,वडगाव ४१२२, वांजरवाडा ३३६२, येलदरा ४२१५, रामपूर तांडा ४११३, येवरी- ४१७ अशी एकूण ९८४६३ कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

यात प्रामुख्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर ३८, रस्ते- ३१६ , पांदण रस्ते ३१९, ग्रामपंचायत भवन ७३, अहिल्यादेवी सिंंचन विहीर १८१५, पडीक जमिनीवर वृक्ष लागवड १९००, ग्राम सबलीकरण क्रीडांगण ३०१, सार्वजनिक स्मशानभूमी १८२, अंगणवाडी बांधकाम ७७, पेवर ब्लॉक ४२ , सीसी रोड ४२, बाजार ओटा ५०, सिमेंट नाला बांध ११४, रोपवाटिका ८, वृक्ष लागवड ३३३००, निर्मल ग्राम शोषखड्डे २२५००, सामूहिक सिंचन विहीर २१५, घरकुल ३९५०, कल्पवृक्ष फळबाग ७०७०, शेततळे ८४३, बांधावर वृक्ष लागवड ४४००, गुराचा गोठा ४४००, शेळी पालन शेड ४३०,आदी कामांचा समावेश आहे. ही कामे तालुका कृषी अधिकारी, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनीकरण विभाग यांच्या मार्फत केली जाणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या