23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरजळकोट तालुका तापीच्या आजाराने फणफणला

जळकोट तालुका तापीच्या आजाराने फणफणला

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यामध्ये तापीचे रुग्ण प्रचंड प्रमाणामध्ये वाढले आहेत. प्रत्येक घरामध्ये एक तरी तापीचा रुग्ण आहे.वातावरण बदलामुळे नागरिक आजारी पडत असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यातआले.प्रत्येक घरामध्ये तापीचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे जळकोट तालुका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

जळकोट तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले परंतु हे रुग्ण कमी होते न होते तोच आता व्हायरल इन्फेक्शनमुळे तालुक्यात ताप सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहेत.

लहान मुलासहित मोठे देखील तापी ने फणफणले आहेत . अनेक गावांमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.तालुक्यातील लाळी खुर्द येथे प्रत्येक घरा गणिकडेंगू सदृस्य आजाराचे रुग्ण होते. तसेच या गावांमध्ये चिकनगुनियाची साथही मोठ्या प्रमाणात आली होती सर्वप्रथम या गावांमध्ये डासांचे निर्मूलन करण्यासाठी धूर फवारणी करण्यात आली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ताप सर्दी खोकला अंगदुखी या आजाराचे रुग्ण वाढत असल्यामुळे खाजगी रुग्णालयात सध्या गर्दी दिसून येत आहे.यातील अनेकांना डेंगू सदृष्य आजाराचे निदान होत आहे. यामुळे नागरिकांनीआपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे .

प्रत्येक घरात अबेटिंग करणार: डॉ.पवार
व्हायरल इन्फेक्शनमुळे नागरिक आजारी पडत आहेत. आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी घरोघर जाऊन अबेटिंग करणार आहेत . तसेच आरोग्य विभागामार्फत ग्रामपंचायतींना प्रत्येक गावांमध्ये डास निर्मूलनासाठी धुर फवारणी करण्याच्या सूचना देण्यातआल्या आहेत तसेच नालेसफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी कोरडा दिवस पाळावा , घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी संजय पवार यांनी केले आहे

गोरठेकरांच्या घर वापसी मुळे कॉंग्रेसची डोखेदुखी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या