29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeलातूरजळकोटला महावितरणचे कार्यालय कार्यान्वित

जळकोटला महावितरणचे कार्यालय कार्यान्वित

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथील कार्यालयासाठी ग्राहक संख्या कमी पडत होती मात्र कुठल्याही परिस्थितीत जळकोटला हे कार्यालय मंजूर करायचे हा निर्धार केला होता. मुंबई येथील प्रकाशगड कार्यालयाच्या २५ चकरा मारल्या व निकषात बसत नसतानाही जळकोट येथे विशेष बाब म्हणून महावितरणचे उपविभागीय अभियंता कार्यालय मंजूर करून घेतले असून ते आता कार्यानिवत झाले आहे, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना केले.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष मन्मथ किडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, माजी जि.प सदस्य बाबुराव जाधव,काँग्रेसचे गटनेते संतोष तिडके, माजी जि.प सदस्य चंदन नागरगोजे , नगरसेविका सुरेखा गवळे , अ‍ॅड पाटील धोंडुतात्या, खादर लाटवाले, शिवसेना तालुकाप्रमुख मन्मथ बोधले, माजी प स सदस्य अरंिवंद नागरगोजे, विश्वनाथ इंदाळे ,श्याम डावळे, उस्मान मोमिन हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार बनसोडे यांच्या हस्ते नविन कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.

जळकोट तालुका निर्मितीनंतर आजपर्यंत महावितरणचे उपविभागीय कार्यालय सुरु झाले नव्हते जळकोट येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी होत होती परंतु हे कार्यालय मंजूर होण्यासाठी अपेक्षित विज ग्राहक असणे आवश्यक होते. परंतु विशेष बाब म्हणून जळकोट येथे महावितरणचे उपविभागीय अधिकारी कार्यालय कार्यान्वीत झाले. असे ते म्हणाले, उदगीर जळकोट मतदारसंघांत सध्या मतदारसंघांमध्ये दहा कोटी पन्नास लाख रुपयांची कामे सुरू आहेत, येणा-या काळात ज्या गावठाणच्या सिंगल फेज डीपी आहेत त्या काढून त्या ठिकाणी थ्री फेज डीपी बसविल्या जाणार आहेत यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या थ्री फेज डीपी बसविण्याचे काम वर्षभरात पूर्ण होईल. त्यासाठी ३०० कोटी रुपये लागणार आहेत.. उदगीर जळकोट मतदार संघासाठी ६०० कोटी रुपयांची वॉटर ग्रीन योजना मंजूर केली असल्याचे माजी मंत्री बनसोडे म्हणाले. उपनगराध्यक्ष किडे म्हणाले की आमदार बनसोडे यांनी अल्पावधीत उदगीर जळकोट मतदार संघामध्ये अनेक विकास कामे केली. दीड वर्ष कोरोनात गेला आणि फक्त दहा महिनेच बनसोडे यांना काम करण्यासाठी मिळाले.

या दहा महिन्यात मतदारसंघाचा कायापालट त्यांनी केला आहे. बनसोडे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून तिरु नदीवर बॅरेजेस मंजूर करून घेतले. तालुक्यात अनेक कामे असे आहेत की जे अशक्य होते ते त्यांनी शक्य करून दाखवले आहे. आमदार बनसोडे यांनी तीन वर्षांमध्येच ९० टक्के वचनपूर्ती करून दाखविली आहे .राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे म्हणाले की, आमदार बनसोडे म्हणजे विकासाची दृष्टी असल्याने नेता असून त्यांच्या अथक प्रयत्नातून हे कार्यालय मंजूर झाले आहे. तालुक्यात असे एकही काम नाही की त्यांनी ते काम मंजूर केले नसेल. याप्रसंगी कार्यकारी अभियंता दराडे, बाबुराव जाधव, चंदन पाटील, मारुती पांडे, श्याम डावळे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमास कॉंग्रेसची शहराध्यक्ष महेश धुळशेटे ,माजी उपसभापती दत्ता पवार,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोक डांगे, नगरसेवक विनायक डांगे, गोंिवद भ्रमन्ना, युवाराष्ट्रवादीकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यवान दळवे पाटील, सरपंच शिरीष चव्हाण, बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृष्ण पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष शंकर सोप्पा, माजी नगरसेवक शिवानंद देशमुख, माजी सरपंच मेहताब बेग, बालाजी आगलावे, नागनाथ धुळशेट्टे, यादव केंद्रे, संतोष पवार, अजित मोमीन, संजय देशमुख, पाशा शेख, सरपंच राजीव सगर, नुर पठाण, यांच्यासह कार्यकारी अभियंता सायस दराडे, उपकार्यकारी अभियंता भोसले, टोणपे, प्रदीप काळे, रोहित तरटे- (कनिष्ठ अभियंता) संदिप राठोड, शाम बोरुळे यांच्यासह महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या