32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरजळकोटची बीएसएनएल सेवा दोन दिवसांपासून ठप्प

जळकोटची बीएसएनएल सेवा दोन दिवसांपासून ठप्प

एकमत ऑनलाईन

जळकोट : सध्या केंद्र सरकारचे दूरसंचार मंत्रालय बीएसएनएलचे आहेत ते ग्राहक दूर लोटण्याचा तयारीत असल्याचे दिसून येत आहे, दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे सतत दुर्लक्ष होत आहे. आता बोटावर मोजण्याइतके ग्राहक शिल्लक राहिले आहेत आणि त्यांना पण बीएसएनएल चांगली सुविधा देत नाही. जळकोट तालुक्यातील बीएसएनएल सेवा गत चार दिवसांपासून बंद आहे त्यामुळे तालुक्यातील बीएसएनएल ग्राहकांचे मोबाईल केवळ खेळणी बनले आहेत. अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचा-यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सध्या बीएसएनएल वर प्रेम करणारा अनेक ग्राहक वर्ग आहे, दुस-या किती खाजगी कंपन्या आल्या आणि किती सुविधा दिल्या तरीही ही अनेक जण बीएसएनएलचे सिम कार्ड वापरतात या बीएसएनएलची जळकोट तालुक्यामध्ये सेवा चांगली नसली तरी अनेक जण बीएसएनएल सिम कार्ड वापरतात. जळकोट मध्ये बीएसएनएलची वर्षभरापूर्वी ४ जी सेवा सुरू झाली, यामुळे काहीतरी सुधारणा होईल असे वाटत होते, तसेच ग्राहकांना चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ही अपेक्षा आता फोल ठरत आहे. दररोज थोडा वेळ तरी बीएसएनएलची सेवा खंडित होत असते.जळकोटचे ग्राहक थोड्या वेळेच्या खंडित सेवेला समजून घेतात परंतु जर दोन ते तीन दिवस मोबाईल सेवा बंद असेल तर याला काय म्हणावे असा सवाल बीएसएनएलच्या ग्राहकांना पडला आहे,

जळकोटमध्ये अनेक खाजगी कंपन्या आहेत की त्या चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत, जळकोट येथील टेलिफोन एक्सचेंज ऑफिसला उदगीरहून ओएफसी आली होती, परंतु उदगीर ते जळकोट राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरूअसल्यामुळे अनेक ठिकाणी वायर तुटले यामुळे ही सेवा खंडित झाले यानंतर शिरूर ताजबंद ते जळकोट एक ओएफसी लाईन आली होती त्या लाईनला कनेक्शन घेण्यात आले होते मात्र जांब ते जळकोट यादरम्यान रोडच्या खोदकामाचे काम सुरूआहे, त्यामुळे जळकोट ची सेवा खंडित झाली असावी असा कयास बांधला जात आहे. तसेच शिरूर ताजबंद येथे काही बिघाड झाल्यास जळकोटची सेवा बंद होते. गत सहा महिन्यांपासून असेच सुरूआहे परंतु याकडे लक्ष देण्यास अधिका-यांना वेळ नाही.

खाजगी मोबाईल कंपन्यांचे वायरदेखील तुटतात परंतु ते तास-दोन तासांमध्ये दुरुस्ती करतात परंतु तीन चार दिवस बीएसएनएलची मोबाईल सेवा बंद आहे. याचा फटका बीएसएनएल सिम कार्ड असणा-या ग्राहकांना बसत आहे. अनेक सरकारी कर्मचारी असे आहेत की ते बीएसएनएल कार्ड वापरत असतात परंतु गत दोन दिवसांपासून फोन बंद असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

व्हॅलिडिटी वाढवून द्यावी
जळकोट मध्ये सतत बीएसएनएल सेवा खंडीत होत आहे. ग्राहक हे विविध रिचार्ज घेतात पंरतु सेवा च बंद असल्याने ना फोन लावता येत नाही ना इंटरनेट चालत नाही. त्यामुळे बीएसएनएल मध्ये पैसे टाकल्यानंतर, सेवा बंद असली तरी व्हॅलिडिटी वाढवून मिळत नाही. यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे बीएसएनएलची जेवढी दिवस सेवा बंद आहे, तेवढी व्हॅलीडीटी वाढवून द्यावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

कोविड योद्ध्यांना सेवेत पूर्णपणे सामावून घ्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या