25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील प्रकल्पांत ३३२.४१५ दलघमी पाणीसाठा

जिल्ह्यातील प्रकल्पांत ३३२.४१५ दलघमी पाणीसाठा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात मोठे, मध्यम प्रकल्प दैनिक पर्जन्य पाणी पातळी व साठा सन-२०२२ सर्व एकंदर एकूण पाणीसाठा ३३२.४१५ दलघमी, मृतपाणीसाठा १३५.७३२ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा १९६.६८३ दलघमी असून उपयुक्त पाणी साठ्याची एकूण २६.१४ टक्केवारी आहे.

जिल्ह्यात मोठे, मध्यम प्रकल्प दैनिक पर्जन्य पाणी पातळी व साठा सन-२०२२ साठीचा आज रोजी (दिनांक ११ जुलै) दोन मोठे प्रकल्पामध्ये एकूण पाणीसाठा १७२.१३३ दलघमी, मृत साठा ७७.०९७ दलघमी, उपयुक्त पाणी साठा ९५.०३६ दलघमी, उपयुक्त पाणीसाठ्याची ३५.४४ टक्केवारी आहे. आठ मध्यम प्रकल्प एकूण पाणीसाठा ५३.८८२ दलघमी, मृत पाणीसाठा २४.९५५ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा २८.९२७ दलघमी, उपयुक्त पाणी साठ्याची २३.६८ टक्केवारी आहे. १३२ लघु प्रकल्प एकूण पाणीसाठा ८४.७५१ दलघमी, मृत पाणी साठा ३३.६८० दलघमी, उपयुक्त पाणी साठा ५१.०७१ दलघमी, उपयुक्त पाणीसाठ्याची १६.७५ टक्केवारी आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून संततधार भिजपाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतक-यांची दुबार पेरणीची चिंता मिटली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यातील दहाही तालुक्यात सर्वदुर पाऊस आहे. कुठे कमी, कुठे अधिक पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकुरसह काही तालुक्यांत सतत पाऊस पडत असल्याने खरिपातील शेती पिकांत पाणीच पाणी दिसून येत आहे. त्यामुळे उगवलेली कोवळी पिके पाण्याखाली गेलेली दिसून येत आहेत. कोवळी पिके पिवळी पडत आहेत. त्याचबरोबर जागेवर पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे पाऊस पडूनही शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन ज्या ज्या तालुक्यांतील पिके पाण्याखाली आहेत, त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात मांजरा, निम्न तेरणा हे दोन मोठ, आठ मध्यम तर १३२ लघु असे एकुण १४२ प्रकल्प आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या