लातूर : प्रतिनिधी
युवासेना नेतृत्त्वावर टीका करीत शिवसेनेशी गद्दारी करणा-या युवासेना विस्तारक अविनाश खापे यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करुन शिवसैनिक व युवासैनिकांनी शनिवारी येथे निषेध नोंदविला. युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेनेशी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी वेगळी चूल मांडल्यानंतर लातूर येथे युवासेना विस्तारक अविनाश खापे यांनी युवासेनेच्या नेतृत्वावर टीका करीत बंडखोर शिंदे गटात सहभागी झाल्याचे जाहीर केले. यावेळी युवासेनेच्या नेतृत्वावर त्यांनी टीका केली होती. या टीकेमुळे शिवसैनिक व युवासैनिक संतप्त झाले असून युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी १ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खापे यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले. यावेळी युवासैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
या आंदोलनात शिवसेना महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, शहरप्रमुख रमेश माळी, उपशहरप्रमुख भास्कर माने व शिवराज मुळावकर, माजी शिवसेना तालुका प्रमुख रमेश पाटील, निलंग्याचे माजी युवासेना तालुकाप्रमुख दत्ता मोहोळकर, राणा आर्य, किशोर मोहिते, सोशल मिडिया प्रमुख अजय घोणे, संगायोचे राहूल रोडे, अमित मंदाडे, बादल काळे, वैभव लंगर, कृष्णा सुरवसे, खंडू जाधव, सूरज पाटील, अमित जाधव, यशपाल चव्हाण, आदित्य कमले, महेश साळुंके, बाळासाहेब दंडिमे, विनोद गुट्टे, सूरज भांडेकर, विलास लवटे, आकाश मोहिते यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.