20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeलातूरकाकाज् ग्रुपने राबविला स्वछ व सुंदर परिसर अभियान

काकाज् ग्रुपने राबविला स्वछ व सुंदर परिसर अभियान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणारे काकाज् ग्रुप लातूरचे संचालक विजयकुमार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काकाज् इंग्लिश व सेमी इंग्लिश स्कूलमध्यील विद्यार्थ्यांना सोबत घेत अंबाजोगाई रोडवरुन काशिलिंगेश्वर मंदीराकडे जाणा-या रस्त्याची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुंदर परिसर यावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत सामाजिक दृष्टीकोन कळण्यासाठी मदत होऊन आजपासून घर, परिसर व पर्यायाने विविध क्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प केला. स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदतच होणार आहे. काकाज् ग्रुप लातूरचे संचालक विजयकुमार धुमाळ यांनी स्वच्छ व सुंदर परिसर या अभियानाचे उद्घाटन करुन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना सामाजिकता व संस्कारांचा अनमोल वारसा जपुन पुढील वाटचाल केली पाहिजे. आभार प्रदर्शन ऋतुजा धावारे हिने केले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या