20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeलातूरमहाराष्ट्राच्या गाडीत कर्नाटकचे इंधन

महाराष्ट्राच्या गाडीत कर्नाटकचे इंधन

एकमत ऑनलाईन

उदगीर : बबन कांबळे
उदगीर शहर हे कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगाना या तीन राज्याच्या सीमेवर वसलेले आहे. महाराष्ट्रामध्ये शासनाकडून नियम अटी काही लादण्यात आले. तर या नियम अटीस पळवाटा शोधण्या करीता कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगणा यातील राज्याचा आसरा महाराष्ट्राचे नागरिक घेतात. ब-याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असले तरी कर्नाटकमधून अवैध मार्गाने गुटखा पुरवठा केला जातो. शेतीसाठी लागणारे बी-बियाणे खते सुद्धा महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक मध्ये कमी किंमत असल्याने या सीमावर्ती भागातील शेतकरी बियाणे व खते खरेदी करण्याकरिता कर्नाटकाकडे धाव घेतात.

सध्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटक पेक्षा डिझेल व पेट्रोलचे भाव आठ ते दहा रुपयांनी महाग असल्याने उदगीर व परिसरातील वाहने इतर राज्यांमध्ये प्रवास करताना आपल्या वाहनांमध्ये डिझेल व पेट्रोल महाराष्ट्रात न भरता ते कर्नाटक राज्यातील कमलनाथ येथील पेट्रोल पंपावर भरत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यामध्ये डिझेल ८५.३० तर पेट्रोल १००.८८ रुपये आहे. तर महाराष्ट्र लातूर मध्ये डिझेलचे भाव ९३.५४ रुपये व पेट्रोलचे भाव ११०.७८ पैसे इतका आहे. डिझेल मध्ये प्रति लिटर ८ रुपये २४ पैसे चा फरक असून पेट्रोल मध्ये ९ रुपये ९० पैसे फरक असल्याने महाराष्ट्राच्या वाहनांमध्ये कर्नाटकचे इंधन भरण्यात येत आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरच्या विविध कर कमी करून डिझेल व पेट्रोलचे भाव कमी केले. हे कर कमी करण्याकरिता त्या त्या राज्यांना अधिकार असल्याने महाराष्ट्र शासनाने कोणताही कर कमी न केल्याने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांच्या डिझेल व पेट्रोल मध्ये आठ ते दहा रुपयाचे फरक जाणवत आहे. राज्य शासनाने डिझेल व पेट्रोल वरचे कर कमी करून इंधनाचे भाव कमी करावे, अशी मागणी उदगीरातील नागरिकांतून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या