36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरकेबीसीमध्ये धडक मारणार्‍या कु. अस्मिता गोरेचा गौरव सोहळा

केबीसीमध्ये धडक मारणार्‍या कु. अस्मिता गोरेचा गौरव सोहळा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रेरणा आणि प्रोत्साहन हे सक्षम यशाचे दोन पैलू असतात. त्याच्याच जिवावर माणूस आपल्या जिवनात हवी ती ध्येय्य आणि उदिष्ट्ये साध्य करु शकतो. याचा साक्षात्कार लातूरकरांच्या गुणवत्तेचा झेंडा लोकप्रिय टिव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये रोवणारी विद्यार्थीनी कु. अस्मिता माधव गोरे हिने करुन दाखविला आहे असे गौरवोद्गार बसवेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांनी आज काढले.

शिवशंकरप्पा बिडवे हे आज बिडवे इंजिनीअरींग कॉलेजद्वारे आयोजित कु. अस्मिता गोरे गौरव सोहळ्यास संबोधीत करत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा संपूर्ण देशात गवगवा आहेच. परंतू त्याच गुणवत्तेच्या जोरावर लातूर येथील बिडवे इंजिनीअरींग महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. अस्मिता माधव गोरे हिने नुकताच टिव्हीवर सुरु झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्येही हॉटसिटवर बसून आपला दबादबा निर्माण केला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बसवेश्‍वर शिक्षण संस्थेचे संचालक मन्मथअप्पा येरटे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे आदींची उपस्थिती होती. सर्व उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य बस्वराज धरणे कौल बनेगा करोडपती या टीव्ही शोच्या हॉटसिटवर बसून आपल्या बौध्दीक क्षमतेची चुणूक सर्व देशाला दाखवणारी अस्मिता गोरे ही लातूर येथील रहिवाशी असून तिचे वडील अंध असून तिची आई ही एका डोळ्याने अंध आहेत. वयाच्या केवळ 22 वर्षी आपल्या कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी खोद्यावर पेलणार्‍या अस्मिताचा संपूर्ण देशातून गौरव केला जात आहे.

अस्मिता गोरेने आपली गुणवत्ता या शोमध्ये दाखवल्याने तिच्या हुषारीची सर्वत्र कौतुक होत आहेच परंतू इंजिनीअरींग परीक्षेनंतर तिला एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षा देऊन प्रशासकिय सेवेतील मोठे अधिकारी व्हायचे स्वप्न आहे. तिच्या या धडपडीसाठी बसवेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. बिडवे यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. त्याशिवाय गौरव समारंभा प्रसंगी तिला स्पर्धा परीक्षांच्या काही निवडक व दर्जेदार पुस्तकांचा संचही भेट देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य खडोट सर, प्रा. धर्मराज बिरादार आणि अन्य कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. गौरव सोहळ्याच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. श्रीकांत तांदळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आणि गौरव सोहळ्याच्या आयोजकांचे आभार प्रदर्शन प्रा. खटोड सर यांनी केले.

दगडाने ठेचून महिलेचा खून, पोलीस कर्मचा-यासह अन्य एक ताब्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या