27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरकेकतसिंदगीचा साठवण तलाव शंभर टक्के भरला

केकतसिंदगीचा साठवण तलाव शंभर टक्के भरला

एकमत ऑनलाईन

जळकोट: तालुक्यातील केकत शिदगी येथील साठवण तलाव ,गत पंधरा वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. यानंतर हा साठवण तलाव तब्बल पंधरा वर्षांनी शंभर टक्के भरला आहे. यामुळे गावक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकनेते तत्कालीन आमदार कै. चंद्रशेखर भोसले यांनी या साठवण तलावाचे मंजुरी आणली होती. त्यांच्या काळामध्ये या साठवण तलावाचे काम पूर्ण झाले होते. यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली आली होती. परंतु गत अनेक वर्षांपासून या भागात मोठा पाऊस झाला नसल्यामुळे हा तलाव काठोकाठ भरला नव्हता परंतु यावर्षी जळकोट तालुक्यामध्ये मोठा पाऊस आणि तो सलग झाल्यामुळे हा साठवण तलाव काठोकाठ भरला असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे.

यावेळी समस्त ग्रामस्थांच्या वतीने जलपूजन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, गजानन चंदावार, दीपक हंगरगे, बालाजी केंद्रे, नामदेव गीते, संजय दळवे, महांिलग हंगरगे, बापूसाहेब दळवे, परमेश्वर गोंड,उपसरपंच तानाजी दळवे, महेश गोंड, सुरज मिरजगावे, बाळू आवरादे , अमर दळवे, माधव हंगरगे इत्यादी सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या