18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरपरतीच्या पावसामुळे खरीप पिकांत पाणी साचले

परतीच्या पावसामुळे खरीप पिकांत पाणी साचले

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : परतीच्या पावसाने सोमवारी जोरदार दणका दिला. दुपारपासून सायंकाळपर्यंत शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. सध्या तालुक्यात सोयाबीन कापणीला वेग आला असतानाच परतीचा पाऊस दणका देत असल्याने शेतकरीचिंतातूर झाला आहे. सततच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केल्यानंतर थोडासा थांबलेला पाऊस परतीच्या रूपाने पुन्हा सक्रीय झाला आहे. सोयाबीन कापणीच्या वेळेतच या परतीच्या पावसाने सबंध तालुक्याला झोडपले आहे.

यात शेतीत सखल भागात पाणी साठले असून या दमदार पावसाने होनमाळ रस्त्यावरील अजनी बु.रोड वाहून गेल्याने काही काळ वाहतुक बंद झाली होती. दरम्यान यंदा पेरणी झाल्यापासून पाऊस पडत असल्याने शेतक-यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. सततच्या पावसाने सोयाबीन धोक्यात आले आहे. त्यात सध्या सोयाबीन काढणीचे दिवस असताना परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने शिल्लक सोयाबीन ही भिजून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

अजनी (बु.)चा मुख्य रोड गेला वाहून
या परतीच्या जोरदार पावसाने ओढे नाल्यांना पुर येऊन ते दुथडी वाहत होते. यात अजनी बु. गावाला शिरूर अनंतपाळ शहराला जोडणारा रस्ता या पावसाने वाहून गेला असून वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे.परिणामी या संबंधित विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या