21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप पिके पाण्यात

शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप पिके पाण्यात

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : दोन दिवसांच्या उघडीपीनंतर रविवारी सायंकाळी तालुक्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरु केल्याने खरीप पिके पाण्याखाली गेली असून अतिपावसामुळे कोवळी पिके पिवळी पडू लागली आहेत. तर अधिक दिवस पाणी साठलेल्या ठिकाणची पिके सडू लागली आहेत. या सततच्या पावसाने खरीप हंगाम धोक्यात आले असून शेतक-यांतून पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून संततधार पावसानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी आंतरमशागत व फवारणीच्या कामाला लागले होते मात्र रविवारी सायंकाळी पुन्हा पावसाने जोरदार एंट्री केल्याने शेती कामे बंद झाली आहेत. या पावसाने नदी, नाल्यांना पुर आला असून खरीप हंगामातील पिकांसह भाजीपालावर्गीय पिके पाण्याखाली गेली आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. दरम्यान यंदा शिरूर अनंतपाळ तालुक्यात शेतर्क­यांनी खरिपात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर तूर,मुग,उडीद ही पिके घेतली. गेल्या वर्षी पुरामुळे खरीप हंगाम हातचे गेले.तर यावर्षी अतिवृष्टीने पिके पिवळी पडून सडू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा खरिपातील पिके हिरवीगार उभारून आली होती, पण आता मात्र या अति पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून पुढे होणा-या पावसाही शेतक-यांनी धास्ती घेतली आहे.

शेतक-यांच्या अडचणी वाढल्या
शेतक-­यांपुढे कायम अडचणी निर्माण होतात. शेतक-यांनी घेतलेली महागडे बियाणे त्यातच त्यांची उगवणक्षमता कमी, काही बियाणे उगवले नसल्याने काही शेतक-यांनी दुबार पेरणी करून पिके जोमात आणली होती, पण या सतत पडणा-या पावसाने मात्र पिके पाण्याखाली येऊन सडू लागल्याने खरिप हंगाम धोक्यात आला असून मायबाप सरकार शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी,अन्यथा पुन्हा एकदा शेतकरी मोडकळीस आल्याशिवाय राहणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

-मोहनराव भोसले, शेतकरी धामणगाव.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या