23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूर६ लाख हेक्टरवर होणार खरीपाचा पेरा

६ लाख हेक्टरवर होणार खरीपाचा पेरा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी बागायतीचे क्षेत्र कांही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी खरीपाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्यामुळे यावर्षी ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होईल असा कृषि विभागाचा अंदाज
आहे. त्यामुळे खरीप हंगामात रासायनीक खताची व बी-बीयाणांची कमतरता भासू नये म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने बी-बियाणे व खताची मागणी केली आहे.

खरीपाच्या पेरणीपुर्व शेतातील मशागतीची कामे शेतक-यांनी हाती घेतली असून ती अंतीम टप्यात आहेत. शेतकरी अधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरवर पूर्ण करत आहेत. तर ज्या शेतक-यांकडे बैल बारदाना आहे. त्यांनी सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतात नांगरनी, मोगडा, कुळव चालवत मशागतीची कामे करत आहेत. पावसाळा १५ ते २० दिवसावर येऊन ठेपल्याने शेतकरी शेतीची कामे मार्गी लावण्याचे काम सुरू आहे.

यावर्षी ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होणार आहे. यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. ९० हजार हेक्टर क्षेत्रावर तुर, १० हजार हेक्टर क्षेत्रावर मुग, ८ हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद, १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, ४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका, १ हजार हेक्टर क्षेत्रावर भुईमुंग, ८०० हेक्टर क्षेत्रावर तीळ, तसेच उर्वरीत क्षेत्रावर बाजरी, साळ, सुर्यफूल, व तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्यांचा पेरा होणार असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या