22.5 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home क्राइम घरासमोरुन पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण

घरासमोरुन पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण

रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील घटना

एकमत ऑनलाईन

रेणापूर : रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील एका ५ वर्षीय मुलाचा शुक्रवार दि. ११ सप्टेंबर सायंकाळी घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चारचाकी वाहनातून अपहरण करून घेवुन गेल्याची घटना घडली आहे. या मुलाच्या आजोबांनी दिलेल्या
फिर्यादीवरून रेणापुर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.

रेणापुर तालुक्यातील सांगवी येथे देविदास विठ्ठलराव सावंत यांचा नातू रियांश नीळकंठ सावंत (वय ५ वर्ष) हा मुलगा काही दिवसापासून त्यांच्याकडे सांगवी येथे राहत होता. त्याचे आई-वडील हे ठाणे येथे अनेक वर्षापासून स्थायिक आहेत. ते त्या ठिकाणी एक मोठे व्यापारी आहेत. रियांश याचे वडील मैत्री आनंद बिल्डींग लुईसवाडी, ठाणे येथे राहतात. हा मुलगा काही दिवसापूर्वी सांगवी येथे आजी-आजोबा कडे आला होता.

मात्र शुक्रवारी संध्याकाळी तो घराच्या समोर खेळत असताना एका कारमध्ये रियांशला जबरदस्तीने उचलून चार चाकी मध्ये घेऊन गेल्याचे तेथील आजूबाजूचे लोकांनी सांगीतल. याबाबत रियांशचे आजोबा देविदास विठ्ठलराव सावंत (वय ६९) यांनी तात्काळ रेनापुर पोलीस स्टेशन गाठून रेणापूर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून रेणापुर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलिस निरीक्षक गोरख दिवे व अन्य अधिकारी यांनी रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जाऊन भेट दिली. ज्या मार्गाने गाडी गेली, त्या रस्त्याची तपासणीच्या अनुषंगाने पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोरख दिवे हे करीत आहेत.

१२ वेगवेळे पथके नियूक्त
रेणापुर तालुक्यातील सांगवी या छोटयाशा गावातून रियांश अपहरण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कोणत्या उद्देशाने या मुलाचा अपहरण झालं याची चर्चा तालुक्­यात सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखालील १२ वेगवेळे पथक नियूक्त करुन ८ पथके जिल्ह्याबाहेर तर ४ पथके स्थानिक तपास करीत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे यांनी दिली.

लातूर- नांदेड बस वर सोनखेला दगडफेक

ताज्या बातम्या

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना...

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

आणखीन बातम्या

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

दिवसाला ८७ स्त्रियांवर बलात्कार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देशभरातच महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ...

कुटुंब तपासणी मोहिमेतून तयार होणार लातुरची आरोग्य सुची – उपमहापौर

लातूर : लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात माझे कुटुंब मानसी जबाबदारी मोहीम राबवली जात असून या माध्यमातून प्रत्येक घरात आरोग्य तपासणी केली जात आहे यातून शहरातील...

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आजपासून

लातूर : महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यामार्फत एमएचसीईटी परिक्षा आज दि. १ ते ९ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत...

मनरेगातून ग्रामविकास’ साधण्यासाठी हवी जागरूकता

लातूर : मनरेगाच्या माध्यमातून आपण गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो, याची माहिती सरपंचांनी करून घेतली पाहिजे. त्यासाठी सरपंचांमध्ये जागरूकता वाढायला हवी. त्यांनी मनरेगाचा सूक्ष्म...

किल्लारीत भुकंपात मरण पावलेल्या स्मृती स्तंभास आभिवादन

किल्लारी : सकाळी 8 वाजता जुने किल्लारी येथे समृती स्तंभाला आ.आभिमन्यु पवार तहसीलदार शोभा पुजारी , सरपंच शौला लोहार सपोनी विनोद मेञेवार शंकरराव परसाळगे...

लातूर जिल्ह्यात आणखी २१७ रुग्ण वाढले; आणखी ५ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. मात्र, मागच्या काही दिवसांत रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र होते. मात्र, आज आणखी २१७ नवे...

३० सप्टेंबरची काळ रात्र

किल्लारी (महेश उस्तुरे) : २७ वर्षापूर्वी ३० सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन करुन शांत झालेल्या किल्लारी व परिसरात उष:काल होता होता काळराञ झाली होती. भूकंपामुळे...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...