28.6 C
Latur
Tuesday, May 18, 2021
Homeलातूरकिल्लारी, मारुती महाराज हे दोन्ही कारखाने सुरूकरा

किल्लारी, मारुती महाराज हे दोन्ही कारखाने सुरूकरा

एकमत ऑनलाईन

औसा : औसा विधानसभा मतदारसंघातील वाढते ऊसाचे क्षेत्र व ऊस उत्पादक शेतक-याचा ऊस वेळेवर गाळप होण्याच्या दृष्टीने मतदारसंघातील सध्या बंद असलेला किल्लारी व बेलकुंड येथील साखर कारखाना सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने ऊसउत्पादक शेतक-यांची ही अडचण सोडविण्यासाठी या दोन्ही साखर साखर कारखान्यांना विशेष बाब म्हणून थकित कर्जास व पुर्व हंगामी कर्जास शासनाने थकहमी देवून दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यात यावेत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री अमित देशमुख यांची मुंबई येथे आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट घेवून मतदारसंघातील ऊसाचे वाढलेले क्षेत्र, बंद असलेले साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतक-यांची अडचण दूर होण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना याबाबत सखोल चर्चा केली. औसा विधानसभा मतदारसंघात तेरणा व तावरजा या दोन नद्या असून या दोन्ही नद्यांवर मध्यम प्रकल्प व बॅरेज आहेत यंदा मुबलक पाऊस झाल्याने सदर मध्यम प्रकल्पासह साठवण तलाव व अन्य जलस्रोत पाण्याने भरली आहेत. गतवर्षी परतीचा मुबलक पाऊस पडल्याने शेतक-यांनी संत मारुती महाराज व किल्लारी सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड केली असून औसा मतदारसंघात ५ लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक ऊस उपलब्ध असून यावर्षीच्या मुबलक पावसामुळे हेक्टरी उत्पादनात भरघोस वाढ दिसत आहे.

औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना व किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने मागील दुष्काळी परिस्थिती पाण्याअभावी बंद असून एंकदरीत या दोन्ही साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता व वेळेवर ऊस उत्पादक शेतक-यांचा ऊस कारखान्यास गाळप होण्याच्या दृष्टीने हे दोन्ही साखर कारखाने सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. या दोन्ही साखर कारखान्यांना विशेष बाब म्हणून थकित कर्जास व पुर्व हंगामी कर्जास शासनाने थकहमी देऊन दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यात यावेत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली आहे.

यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी संचालक मधुकर भोसले,दत्ता पाटील किनीकर, शिरीष पवार,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोषअप्पा मुक्ता, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, बालाजी शिंदे,सय्यद लाडखा पठाण, पंचायत समिती सदस्य दिपक चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

दादागिरी नही चलेगी!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या