34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeलातूरकीर्ती ऑइल मिल व रेसिडेन्सी क्लबला ठोकले सील

कीर्ती ऑइल मिल व रेसिडेन्सी क्लबला ठोकले सील

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरातील नागरिक आणि विविध व्यावसायिकांकडे असणारी थकबाकी वसूल करण्याच्या मोहिमेला महापालिकेने गती दिली आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असणा-या व्यावसायिक व नागरिकांच्या मालमत्ता सील केल्या जात असून अशाच एका कारवाईत मंगळवारी दि. २ मार्च रोजी कीर्ती ऑइल मिल व रेसिडेन्सी क्लब या दोन मालमत्तांना महापालिकेच्या अधिका-यांनी सील ठोकले.

लातूर महानगरपालिका आर्थिक अडचणीत आहे.कर्मचा-यांचे वेतन तसेच पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल भरण्यासही महापालिकेला अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वीच वीजबिल थकल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणा-या योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. महापालिकेने ६० लाख रुपये भरुन तो पूर्ववत करुन घेतला आहे. अशा स्थितीतही शहरातील नागरिकांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आयुक्त अमन मित्तल यांनी पुढाकार घेतला असून सक्तीने वसुली करण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. विविध सवलती देऊनही कर भरणा वाढत नसल्यामुळे आयुक्तांनी प्रसंगी मालमत्ता सील करण्याचेही आदेश दिले आहेत.

शहरातील नामांकित असणा-या कीर्ती ऑइल मिल कडे २ कोटी १ लाख ५३ हजार ३८९ रुपये तर एमआयडीसी परिसरात असणा-या रेसिडेन्सी क्लबकडे १८ लाख ४३ हजार ५९६ रुपये मालमत्ता कर थकलेला होता. या दोन्ही मालमत्तांना महापालिकेकडून मंगळवारी सील ठोकण्यात आले. सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर, वसुधा फड, शैला डाके, क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी, संजय कुलकर्णी यांच्यासह वसुली अधिकारी व कर्मचा-यांनी ही कारवाई केली. शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी आपल्याकडे असणारा मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीचा तातडीने पालिकेकडे भरणा करावा अन्यथा मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

‘मंगळा’ची रहस्ये उलगडणार?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या