22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरकोल्हापूर पॅटर्नच्या मुखवट्यांना सर्वाधिक मागणी

कोल्हापूर पॅटर्नच्या मुखवट्यांना सर्वाधिक मागणी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लाडक्या बाप्पाचे मोठ्या थाटात बुधवारी घरोघरी आगमन झाले. आज ज्येष्ठागौरींचे घरोघरी सोनपावलांनी आगमन होणार आहे. गौराईच्या आगमनासाठी लागणारे साहित्य तसेच सजावटीचे साहित्य, मुखवटे, मखर खरेदीसाठी शुक्रवारी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. लातूरच्या बाजारपेठेत कोल्हापूर, अमरावती येथील गौराईचे मुखवटे विक्रीस उपलब्ध झाले आहेत. कोल्हापूर पॅटर्नच्या मुखवट्यांना सर्वाधिक मागणी होती.

हिंदू धर्मशास्त्रात तसेच सामाजिक जीवनात गौरीला शिवशक्ती आणि गनपती बाप्पांची माता मानले जाते. द्वादशगौरीचा उल्लेख अपराजितप्राचीन पुस्तकात करण्यात आला आहे. अग्नि पुराणात असे म्हटले आहे की, गौरीच्या मूर्तीची एकत्रित पूजा केली जात असे. लातूर जिल्ह्यामधील नीलकंठेश्वर मंदिरात शिव आणि गौरीच्या प्रतिमा कोरल्यात आले आहे. ती शिव घराण्यातील देवता असून कानौजमध्ये त्यांचे मंदिर हि पाहण्यास मिळेल. एकदा भुतांनी कंटाळलेल्या सर्व स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि त्यांचे नशिब अबाधित व्हावे म्हणून तिला प्रार्थना केली होती.

बुधवारी घरोघरी बाप्पांचे उत्साहात आगमन झाले आणि आज ज्येष्ठागौराईचे आगमन होणार आहे. त्यानिमित्त लातूर शहरातील मेन रोड, गंज गोलाई, भुसार लाईन, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका, औसा रोडवरील नंदी स्टॉप, खर्डेकर स्टॉप, राजीव गांधी चौक आदी परिसरात गौराईच्या आगमनासाठी लागणारे साहित्य तसेच सजावटीचे साहित्य, मुखवटे, मखर आदींच्या विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात
थाटले आहेत. शुक्रवारी हे साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होती. ज्येष्ठागौरींचे मुखवटे, पिलवंडे, कोथळे, हात, दागिणे, सजावटीचे साहित्य, प्लास्टिकच्या विविध रंगांच्या लडी, विद्यूत रोषणाईच्या माळाची खरेदी केली गेली.

ज्येष्ठागौरींचे जवळपास ११ प्रकारचे सुबक, आकर्षक मुखवटे बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. लोखंडी सळ्या, पातळ पत्र्याचे कोथळेही बाजारपेठेत दाखल झाले आहेत. बाप्पाच्या आगमनानंतर घरोघरी ज्येष्ठागौरींच्या आगमनाची जोरदार तयारी केली जात आहे. आज ज्येष्ठगौरींचे घरोघरी आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने बाजारपेठेत लगबग असून बाजारपेठेत उत्साह दिसून येत आहे.

३० ते ४० टक्क्यांनी दरवाढ
ज्येष्ठागौरीचा सण घरोघरी साजरा केला जात असतो. त्यानिमित्ताने मोठी आर्थिक उलाडाल दरवर्षी होत असते. दोन वर्षाच्या कोरोना आपत्तीनंतर यंदा गणेशोत्सवाप्रमाणेच ज्येष्ठागौरीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. ज्येष्ठागौरींच्या मुखट्यासह इतर साहित्य विक्री करणारे ओमप्रकाश अंबुलगे यांच्याकडे ५०० रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत ज्येष्ठागौरींचे मुखवटे उपलब्ध आहेत. कोथळे ८०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. महागाई वाढल्याने यंदा ज्येष्ठागौरींच्या सणासाठी लागणा-या वस्तूंच्या दरामध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे ओमप्रकाश अंबुलगे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या