29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeलातूरकोवीड रुग्ण घेताहेत योगासने, ध्यान सरावाचा आनंद

कोवीड रुग्ण घेताहेत योगासने, ध्यान सरावाचा आनंद

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शहरातील शिवनेरी येथील कोविड सेंटरमध्ये उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार अतुल जटाळे यांच्या पुढाकारातून पॉझीटीव रुग्णांना एकटेपणा जाणवू नये, व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने पतंजली योगाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील हे दररोज सकाळी पॉझिटीव्ह रुग्णांना योग-प्राणायम व ध्यान सराव करून घेत आहेत.

कोविड सेंटरमधील पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढावी व त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होण्यासाठी या योगातून मदत होत असून या योगासनात सूर्यनमस्कार, योगिक, जॉंिगग, मर्कटासन, भुजंगासन यासारखी आसने व रुग्णामध्ये चैतन्य निर्माण होण्यासंबंधी विठ्ठलराव पाटील हे सखोल मार्गदर्शनही करीत आहेत.

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासलेले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग म्हणजे आपली इम्युनिटी मजबूत बनवणे. इम्युनिटी वाढविण्यासाठी योग तुम्हाला मदत करतोकिंबहुना कोरोनावरील रामबाण औषध म्हणजे योग आणि प्राणायाम आहे, असे पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले.

नैराश्­यातून बाहेर पडण्याची गरज
पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये निर्माण झालेले नैराश्­य व एकटेपणा घालविण्यासाठी योगाची आवश्­यकता आहे. त्यादृष्टीने कोवीडशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी व कोरोनाची साखळी तुटण्याच्या दृष्टीने कोविड सेंटरमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
-विकास माने,
उपविभागीय अधिकारी
-अतुल जटाळे, तहसीलदार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ऑक्सीजन टॅंक सुरक्षित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या