20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeलातूरकेशवराज माध्यमिकच्या मुख्याध्यापकपदी कुलकर्णी, कस्तुरे उपमुख्याध्यापक

केशवराज माध्यमिकच्या मुख्याध्यापकपदी कुलकर्णी, कस्तुरे उपमुख्याध्यापक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून प्रदीप प्रभाकरराव कुलकर्णी तर उपमुख्याध्यापकपदी महेश कस्तुरे हे दि. १ नोव्हेंबर रोजी रुजू झाले आहेत. मुख्याध्यापक सुनील वसमतकर हे दि. ३१ऑक्टोबर रोजी शासन नियमानुसार वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त झाले. रिक्त झालेल्या जागेवर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालय, उदगीर येथे मुख्याध्यापक असलेले प्रदीप कुलकर्णी यांची बदली झाली. श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून ते रुजू झाले आहेत. उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांची पदोन्नती होऊन त्यांची प. पू. गोळवलकर गुरुजी विद्यालय, देगलूर (जि.नांदेड) येथे मुख्याध्यापक म्हणून बदली झाली. त्यांच्या रिक्त जागेवर केशवराज माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक म्हणून महेश कस्तूरे हे रुजू झाले आहेत.

शालेय समिती अध्यक्ष शैलेश कुलकर्णी व रेनिसन्स सीबीएसई स्कूल शालेय समिती अध्यक्ष डॉ. मनोज शिरुरे यांनी मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी व उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे यांचे शाळेत स्वागत करुन पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव, रेनिसन्स सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या अलिशा अग्रवाल, सुनील वसमतकर, आस्था कौशल्य विकास केंद्राचे जनसंपर्क अधिकारी राहूल गायकवाड, गुरुनाथ झुंजारे यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या