21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरकुणकी येथे गायीसह दोन वासरांचा अचानक मृत्यू

कुणकी येथे गायीसह दोन वासरांचा अचानक मृत्यू

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील कुणकी येथील सुधाकर केंद्रे यांच्यात एका गाईसह दोन वासरांचा अचानक मृत्यू झाला आहे. या तीन जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. जळकोट तालुक्यात गटातील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे यामुळे अनेक जनावरेही बांधूनच आहेत. उनकी येथील शेतकरी सुधाकर केंद्रे यांनी आपल्या जनावरांना पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवले होते. त्यांना तेथेच चारा टाकला जात होता परंतु दि १२ जुलै रोजी तीन जनावरांचा मृत्यू झाला तर इतर तीन जनावरे अत्यवस्थ होते. या तीन जनावरांवर उपचार करण्यात येत आहेत.

कुनकी येथील सुधाकर केंद्रे यांनी आपल्या गोठ्यात दहा जनावरे बांधली होती. यापैकी सहा जनावरांची तब्येत खालावली यातील तीन जणांवरांचा जागीच मृत्यू झाला परंतु या जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही. पशुवैद्यकीय अधिका-याच्या मार्फत या जनावरांचे पोस्टमार्टम केले जाणार आहे तर या जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल मात्र अचानक शेतक-यांच्या तीन जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे या शेतक-यावर मोठे संकट ओढवले आहे. कुणकी येथे शेतक-यांंसाठी पशुवैद्यकीय दवाखाना असून यादवाखान्यामध्ये कुठलाही कर्मचारी उपस्थित राहत नाही. यामुळे याचा फायदा शेतक-यांना होत नाही, असा आरोप देखील येथील शेतक-यांंनी केला आहे. दवाखान्यात कायमस्वरूपी कर्मचा-यांची नियुक्ती करावी अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या