29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeलातूरलाखो उत्तरपत्रिका मुल्यांकनाअभावी पडून

लाखो उत्तरपत्रिका मुल्यांकनाअभावी पडून

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनांनी पुकारलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे राज्याप्रमाणेच लातूर विभागातही उत्तरपत्रिका मुल्यांकनाचे काम ठप्प झाले आहे. २१ फेबु्रवारीपासून बारावीची परीक्षा सुरु झाली. आतापर्यंत निम्मी परिक्षा संपली. लाखो उत्तरत्रिका मुल्यांकनाअभावी पडून आहेत. उत्तरपत्रिकांची तपासणी रखडल्याने बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनाचा परिणाम बारावी परीक्षेच्या कामकाजावर झाला आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी इत्यादी भाषा, वाणिज्य संघटन, भौतिकशास्त्र या विषयांच्या परिक्षा झाल्या आहेत.

मात्र एकाही विषयाच्या मुख्य नियामकांची सभा झाली नाही. सर्व विषयांच्या मुख्य नियामकांनी बहिष्कारात सहभागी असल्याचे निवेदन राज्य मंडळाला दिले आहे. यामुळे आतापर्यंत झालेल्या सर्व पेपरच्या विद्यार्थ्यांच्या लातूर विभागातील लाखो उत्तरपत्रिका पडून आहेत. लातूर विभागात लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागीय मंडळात बहिष्कारामुळे नियामकांची सभा झाली नसल्याने शिक्षकांची उत्तरपत्रिका उचलेले नाहीत.

शिक्षणक्षेत्रातील न्याय मागण्या दीर्घकाळ प्रलंबीत ठेवणे, वारंवार पत्र, निवेदन देऊनही कोणतेही निराकरण न करणे, शिक्षक संघटनांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने ५ सप्टेंबर शिक्षक दिना रोजी वेगवेगळ्या टप्प्यावर तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलने करण्यात आली. तसेच २२ डिसेंबर रोजी नागपूर विधीमंडळावर संघटनेने केलेल्या आंदोलनादरम्यान सभा घेण्याचे मान्य करुनसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सभा घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव विज्युक्टा व महासंघाने बारावी परीक्षा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष उदय पाटील यांनी सांगीतले.

उत्तरपत्रिका कष्टडीत
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनांनी पुकारलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे लातूर विभागातही उत्तरपत्रिका मुल्यांकनाचे काम ठप्प झाले आहे. लातूरातील उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरु आहे. पेपर संपल्यानंतर सर्व उत्तरपत्रिका शहरातील एका कस्टोडीयनकडे आणुन जमा केले जात आहेत. सर्वच उत्तरपत्रिका सध्या कस्टडीत आहेत.

बहिष्काराचे पत्र आले, वरिष्ठांना पाठवले
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनांनी पुकारलेल्या बहिष्कार आंदोलनाबाबत लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष/ सचिव सुधाकर तेलंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बहिष्काराचे पत्र आले ते पत्र वरिष्ठांना पाठविण्यात आलेले आहे. असे असले तरी उत्तरपत्रिका मार्गस्त आहेत. शिक्षकांचा संप मिटेल तेव्हा उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरु होईल, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व प्रक्रिया सुरु आहे.

या आहेत मागण्या
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना तसेच अंशत: अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा, शासकीय कर्मचा-यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरील लागु करावी, निवडश्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी, वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजूरी द्यावी व आय. टी. आय. विषय अनुदानीत करावा, अघोषित उच्च माध्यमिक विद्यालयाला अनुदानासह घोषीत करुन अंशत: अनुदानावरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला प्रचलीत अनुदानसूत्र तातडीने लागु करावे, अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, विनाअनुदानीतकडून अनुदानितमध्ये बदलीला १ डिसेंबर २०२२ पासून लागु केलेली स्थगिती त्वरील रद्द करावी, शिक्षकांची रिक्त पदे त्वरीत भरावीत, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्यचे निकष शाळा संहितेनूसार असावेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या