22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरकोरोना उपचाराधीन रुग्णांत मोठी घट

कोरोना उपचाराधीन रुग्णांत मोठी घट

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णांत मोठी घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांतील सर्वात कमी उचाराधीन संख्या ४१ एवढी रविवारी नोंदली गेली आहे.मार्च २०२० नंतर प्रथमच इतकी कमी नोंदली गेल्याचे लातूर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दैनंदिन अहवालात नमुद करण्यात आले आहे. जिल्ह्याचा डबलींग रेट ३७१५ असून मृत्यु दर २.६ टक्के एवढा आहे.

गेल्या २४ तासांंत लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. लातूर जिल्ह्यात मार्च २०२० पासून आजपर्यंत ९२४९० जणांना कोरोनाची लागन झालेली आहे. त्यापैकी ९०००८ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत तर कोरोनाबळींची संख्या २४४१ इतकी आहे. कोरोनाची लागण होण्याच्या टक्केवारीपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या अधिक आहे. मार्च २०२० नंतर प्रथमच कोरोनामुक्त होण्याच्या टक्केवारीत एवढी वाढ झाली आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा दर खुप कमी झाला आहे. लातूर जिल्ह्यात आजघडीला १७ जण आयसीयुमध्ये, १ गंभीर मेकॅनिकल व्हेंटीलेटरवर, ६ गंभीर बायपॅप व्हेंटीलेटरव, १२ जण मध्यम ऑक्सिजन, ३ जण मध्यम परंतू ऑक्सिजनवर नसलेले तर १९ जण सौम्य असे एकुण ४१ जण उपचार घेत आहेत.

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ३०४२३८ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी २९९४९२ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झालेला आहे. १७६ जणांचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. ३२३० जणांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी २५५३ आरटीपीसीआर नाकारण्यात आले आहेत. २६१७८१ जणांचा आरटीपीसआर अहवाल निगेटिव्ह आला तर ३६४९८ जणांचा आरटीपीसआर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ५५९९२ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह तर ४६०६०० जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली. एकुण ५१६५९२ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या.

जिल्ह्यातील ५ हजार ७९१ बेड शिल्लक
जिल्ह्यात एक वेळ अशी होती की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला साधा बेड मिळत नव्हता. ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडची तर गोष्टच वेगळी होती. रुग्णाचे नातेवाईक दिवस-रात्र बेडच्या शोधात असायचे. बेडसाठी वशिला, चिठ्ठी, शिफारस, अशा परिस्थितीला अनेकांना सामोरे जावे लागले. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १२७ संस्थांमध्ये कोरोनावरील उचाराची सुविधा निर्माण करुन ८००८ बेड उपलब्ध करुन दिले होत.े. दोन-तीन महिन्यांपूर्वी या सर्वच बेडवर रुग्ण भरती होते. आजघडीला ८००८ बेडपैकी केवळ ४१ बेडवर रुग्ण भरती आहेत. ५ हजार ७९१ बेड शिल्लक आहेत.

मृत्यूमध्ये ७० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील रुग्णांचा समावेश
कोरोनाची लागण झालेले लातूर जिल्ह्यातील २४४१ जण कोरोनाबळी ठरले. त्यातील ८३१ रुग्ण हे ७० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील होते. त्याखालोखाल ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ७२४, ५० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ४४१ तर ५० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील ४४५ रुग्णांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या