30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरशहर माहेश्वरी सभेतर्फे कै. बी. व्ही. काळे रुग्णालयास सॅनिटायझर मशिन भेट

शहर माहेश्वरी सभेतर्फे कै. बी. व्ही. काळे रुग्णालयास सॅनिटायझर मशिन भेट

एकमत ऑनलाईन

लातूर : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लातूर शहर माहेश्वरी सभेच्या वतीने लक्ष्मीनारायण कचोलीया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील कै. बब्रुवान काळे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयास सॅनिटायझर मशिन भेट देण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कै. बब्रुवान काळे आयुर्वेदिक रुग्णालयास सॅनिटायझर मशिन भेट देण्यात आली. याप्रसंगी कोरोना काळात यौद्धा म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह रुग्णालयातील आरोग्य सेवकांचाही कोरोना यौद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

जिल्हा माहेश्वरीचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अनंद मालू, सचिव किशोर बिरादार, प्रकल्प प्रमुख विनोद भुतडा, माहेश्वरी सभेचे उपाध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल लातूरचे अध्यक्ष ऍड. नंदकिशोर लोया, सभेचे उपाध्यक्ष महेश तोष्णीवाल, हरिकिशन भुतडा यांच्यासह माहेश्वरी सभा व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल लातूरचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लातूर महापालिका करणार बाप्पाचे विसर्जन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या