33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर लातूर : नीट परीक्षेला १,१९४ विद्यार्थ्यांची दांडी

लातूर : नीट परीक्षेला १,१९४ विद्यार्थ्यांची दांडी

कोनाच्या सावटाखाली लातूर जिल्ह्यात नीट परीक्षा सुरळीत

एकमत ऑनलाईन

लातूर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४३ केंद्रावर नीट परीक्षा २०२० घेण्यात आली. कोरोनाच्या सावटाखाली जिल्ह्यातील १६ हजार ८८४ विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र प्रत्येक्षात १५ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १ हजार १९४ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पडली.
जिल्ह्यातील १ ते २० परीक्षा केंद्रांवर ८ हजार ६७६ परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. ८ हजार ६७६ परीक्षार्थ्यांपैकी ८ हजार ८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ५८९ विद्यार्थी गैर हजर राहिले, अशी माहिती या २० परीक्षा केंद्राचे समन्वय अधिकारी प्राचार्य भारत भूषण यांनी दिली. २१ ते ४३ या २३ परीक्षा केंद्रात ८ हजार २१२ परीक्षार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी ७ हजार ६०७ परीक्षार्थ्यांनी परीक्षत्त दिली तर ६०५ परीक्षार्थी गैरहजर राहिले, अशी माहिती या परीक्षा केंद्राचे समन्व अधिकारी रमेश राव यांनी दिली. लातूर जिल्ह्यातील १६ हजार ८८४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली तर १ हजार १९४ विद्यार्थी परीक्षेस गैर हजर राहिले.

नीट परीक्षा सुरळीतपणे पार पडावी त्यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरत कलम १४४ लागू करण्यात आले होत. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानूसार विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन केल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येतानाच चेह-यावर मास्क, सॅनिटायझरची बॉटल सोबत घेवून आलेले होते. सकाळी ११ ते दुपारी १.३० यावेळेत परीक्षा केंद्रात जाताना दोन विद्यार्थ्यामध्ये सहा फूटाचे शारिरीक अंतर ठेवूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला. परीक्षत्त केंद्रातील एका वर्गात केवळ १२ विद्यार्थी बसण्यानची परवानगी आहे. त्यानूसार बैठक व्यवस्था करण्यात आली होती. वर्गात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅकनरने तापमानाची तपासणी करण्यात आली.
परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी
आपला पाल्यला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी बहुतांश पालक परीक्षा केंद्रांवर एकत्र आले होते. त्यामुळे सर्वच परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी होती. सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत पाल्याला परीक्षा केंद्रात सोडल्यानंतर पालक परीक्षा केंद्राच्या परीसरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत थांबुन होते. पालकांच्या गर्दीमुळे पोलीसांवर ताण पडला. बहुतांश पालका चारचाकी वाहने घेऊन आल्याने शहरात सकाळी काही काळ वाहतूकीचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, पोलीसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याने वाहतूकीची कोंडी झाली नाही. सायंकाळी ५ वाजता परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसून आली.

नांदेड जिल्ह्यात ३९३ कोरोनाचे नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या