27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरलातूर : भिसे वाघोलीत बाधित झोनमध्ये ४१ घरे

लातूर : भिसे वाघोलीत बाधित झोनमध्ये ४१ घरे

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लातूर तालुका स्तरावरील महसूल, आरोग्य, पंचायत समिती व ग्रामपंचायतीने गावातील ४१ घरांना कंटेन्मेन्ट झोन करून तो परिसर सील केला आहे़ जगात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने त्याचा प्रसार देशात, महाराष्ट्रात झाला आहे़ लातूर जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाची संख्या वाढू लागली आहे.

लातूर तालुक्यात बोरगाव काळेनंतर मसला या गावात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आली होती तर पुणे येथे शस्त्रक्रिया करून भिसेवाघोली येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, तालुका आरोग्य अधिकारी अशोक सारडा, गट विकास अधिकारी शाम गोडभरले यांनी सकाळी भिसे वाघोली येथे धाव घेतली.

कोरोनाबाधित व्यक्तीच्या घराभोवतालची ४१ घरे कंटेन्मेन्ट झोन करून तो परिसर सील केला आहे़ या परिसरात १९१ नागरिक राहतात तसेच रुग्णाच्या संपर्कात असलेल्या घरातील ४ व्यक्तींना व रुग्णाला भेटण्यासाठी गेलेल्या ५ व्यक्ती अशाप्रकारे ९ व्यक्तींना १२ नंबर येथील समाज कल्याण विभागाच्या मुली व मुलांच्या वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अशोक सारडा यांनी दिली.

Read More  ICMR ची परवानगी : भारतानं शोधले ‘कोरोना’चे औषध

मुलाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला
भिसे वाघोली येथील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे़ या व्यक्तीच्या जास्त संपर्कात आलेल्या मुलाचा स्वॉब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले़

घरोघरी जाऊन दररोज तपासणी
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव भिसे वाघोली येथे वाढू नये म्हणून आशा कार्यकर्त्या दररोज घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत़ जर कोणाला लक्षणे दिसून आली तर तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अशोक सारडा यांनी दिली़

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या